रणबीरने केले सलमानला 'ओव्हरटेक'

Ranbir Kapoor's 'Sanju' beats Salman Khan's 'Race 3' at Box Office
Ranbir Kapoor's 'Sanju' beats Salman Khan's 'Race 3' at Box Office

मुंबई - बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक संजू प्रदर्शित झाला आणि चित्रपटाला या वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंग मिळाली. प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने जोरदार कमाई केली असून कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने सलमान खानच्या रेस 3 या चित्रपटाला मागे टाकले आहे. पहिल्या पाच दिवसात संजूने जवळपास 200 कोटी रुपयांचा आकडा गाठला असून हा चित्रपट आणखी मोठी कमाई करेल असे चित्रपट जाणकार मत व्यक्त करत आहेत.

सलमान खानचा रेस 3 हा ईदच्या दिवशी रिलिज झाला होता. सलमानच्या चित्रपटाला रणबीर कपूरच्या संजूने पाचव्याच दिवशी ओव्हरटेक केले असून कमाईच्या बाबतीत संजू पुढे निघून गेला आहे. सलमान खानच्या रेस 3 ने पहिल्या पाच दिवसात 175 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता, तर संजू 200 कोटींच्या जवळपास पोहोचला आहे.

दरम्यान, दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित 'संजू' चित्रपट शुक्रवारी (ता.29) प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने साकारली असून, संजय दत्तच्या आयुष्यात नेमके काय घडले याची सत्यकथा या चित्रपटातून उतरवण्याचा प्रयत्न राजकुमार हिरानी यांनी केला. या चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित माहिती देण्यात आली आहे. संजय दत्त जसा होता, अगदी तशीच बाजू या चित्रपटात दाखवण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसह अभिनेता परेश रावल, अनुष्का शर्मा, विकी कौशल, दिया मिर्झा, सोनम कपूर, करिश्मा तन्ना आणि मनिषा कोईराला यांच्या भुमिका आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com