एक आठवडा रणबीर तुरुंगात 

वृत्तसंस्था
शनिवार, 11 मार्च 2017

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर एक आठवडाभर तुरुंगात राहणार आहे. आश्‍चर्याचा धक्‍का बसला ना? पण, थोडं थांबा. रणबीरने कोणताही गुन्हा केलेला नाही. राजकुमार हिराणी यांचा आगामी चित्रपट हा संजय दत्तवरील बायोपिक आहे. यामध्ये रणबीर संजय दत्तच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यासाठी तो एक आठवडा राहणार आहे. 

संजय दत्तच्या बायोपिकसाठी रणबीर सध्या खूप मेहनत घेतोय. त्यासाठी त्याने तब्बल 13 किलो वजन वाढविले आहे. तसेच संजयसारखे चालण्यासाठी व त्याच्यासारख्या स्टाइलसाठी त्याने दोनशे तास संजयचे व्हिडीओ पाहिले आहेत. ही भूमिका वास्तव्यात उतरवण्यासाठी रणबीर भोपाळमध्ये गेला असून, तिथल्या तुरुंगात एक आठवडा राहणार आहे.