राणीचा कमबॅक 

वृत्तसंस्था
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

एकदा का अभिनेत्रीचं लग्न झालं की, त्या लाईमलाईटपासून दूर जातात. त्यांना मुलंबाळं झालीत की, निर्मातेही त्यांना सिनेमात घेण्यात फारसे धजावत नाहीत; परंतु ऐश्‍वर्या राय आणि काजोलच्या यशस्वी कमबॅकनंतर आता राणी मुखर्जीही रूपेरी पडद्यावर पुन्हा येत आहे. बराच काळ ती चित्रपटापासून लांब राहिली होती. तिचा शेवटचा चित्रपट होता प्रदीप सरकारचा "मर्दानी'. त्यात ती जबरदस्त ऍक्‍शन करताना दिसली होती; पण त्यालाही आता दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला. 2014 मध्ये तिचा "मर्दानी' आला होता. त्यात ह्युमन ट्रॅफिकिंग विषय हाताळण्यात आला होता. राणीच्या कामाची तेव्हा स्तुतीही झाली होती.

एकदा का अभिनेत्रीचं लग्न झालं की, त्या लाईमलाईटपासून दूर जातात. त्यांना मुलंबाळं झालीत की, निर्मातेही त्यांना सिनेमात घेण्यात फारसे धजावत नाहीत; परंतु ऐश्‍वर्या राय आणि काजोलच्या यशस्वी कमबॅकनंतर आता राणी मुखर्जीही रूपेरी पडद्यावर पुन्हा येत आहे. बराच काळ ती चित्रपटापासून लांब राहिली होती. तिचा शेवटचा चित्रपट होता प्रदीप सरकारचा "मर्दानी'. त्यात ती जबरदस्त ऍक्‍शन करताना दिसली होती; पण त्यालाही आता दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला. 2014 मध्ये तिचा "मर्दानी' आला होता. त्यात ह्युमन ट्रॅफिकिंग विषय हाताळण्यात आला होता. राणीच्या कामाची तेव्हा स्तुतीही झाली होती. 2015 मध्ये राणीने आदिरा नावाच्या गोड मुलीला जन्म दिला. ती आता वर्षाची झाल्याने राणीने पुन्हा कामाकडे लक्ष वळवले आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ मल्होत्राच्या "हिचकी' चित्रपटातून ती कमबॅक करतेय. हा चित्रपटही सोशल विषयावर आधारित आहे. त्यात राणी मुख्य भूमिकेत आहे. खरं तर चित्रपटाची कथा अभिनेत्याला समोर ठेवून लिहिण्यात आली होती. अभिषेक बच्चन आणि इम्रान हाश्‍मीला त्याची ऑफरही देण्यात आली होती; पण त्यानंतर आदित्य चोप्रा निर्माता झाल्यावर त्याने चित्रपटाची कथा अभिनेत्रीसाठी असली पाहिजे, असे सांगत त्यात राणीलाच मुख्य भूमिकेसाठी घ्यावे, अशी गळ घातली. साहजिकच राणी आता त्यात एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे. लवकरच राणीचे चाहते तिला रूपेरी पडद्यावर पाहू शकतील. 
 

Web Title: Rani mukharji come back