घडलंय बिघडलंय... 

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 मे 2017

काही वर्षांपासून निर्माता, दिग्दर्शक संजय लीला भन्साळींची पहिली पसंती ही रणवीर सिंगलाच आहे. "रामलीला', मग "बाजीराव मस्तानी'नंतर या दोघांचा आता "पद्मावती' हा तिसरा चित्रपट येतोय. हे दोघं एकमेकांचं कौतुक करताना थकत नाहीत; पण "पद्मावती'च्या चित्रीकरणादरम्यान असं काही घडलं जे घडायला नको होतं.

नुकतीच "पद्मावती'च्या शूटिंग दरम्यान एका सीनवरून रणवीर सिंग आणि संजय लीला भन्साळी यांच्यात चांगलीच वादावादी झाली. दोघं सुरुवातीला या सीनबाबत बराच वेळ चर्चा करत होते आणि या चर्चेदरम्यान त्यांच्यात वादाला सुरुवात झाली. बऱ्याच वादावादीनंतर रणवीर सेट सोडून व्हॅनिटी वॅनमध्ये निघून गेला आणि बराच वेळ तो व्हॅनिटी वॅनमध्येच होता. थोड्या वेळानंतर त्याचा राग शांत झाला. त्यानंतर तो पुन्हा सेटवर दाखल झाला. तसं तर कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यात नेहमीच वाद होत असतात. त्यामुळे ही काही मोठी बाब नाही; मात्र रणवीर आणि भन्साळी यांच्यातील वाद ही नक्कीच आश्‍चर्यकारक बाब आहे. तसं तर या दोघांमध्ये लवकरच सर्व काही नीट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.