Pushpa 2 : 'पुष्पा २' लवकरच.. पण श्रीवल्लीचं काय? निर्माते म्हणाले..

'पुष्पा' चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये 'श्रीवल्ली'चा मृत्यू होणार, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे.
Pushpa 2 Movie News Updates
Pushpa 2 Movie News Updatessakal

Pushpa 2: काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ (Pushpa: The Rise) या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. हे वेड अजूनही कमी झालेलं नाही. प्रेक्षक अजूनही पुष्पा चित्रपटाची गाणी आणि संवाद यामध्ये अडकून आहेत. इतक्या जबरदस्त चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातला. या चित्रपटाचा दुसरा कधी येणार याबाबत प्रेक्षक भलतेच उत्सुक आहे. विशेष म्हणजे 'पुष्पा २' या चित्रपटात 'श्रीवल्ली' या पात्राचा मृत्यू होणार असल्याची जोरदार चर्चा चाहत्यांमध्ये आहे. ही भूमिका रश्मिका मंदनानं (Rashmika Mandana) केली होती. त्यामुळे तिचे चाहते या बातमीने नाराज झाले होते. अखेर चित्रपटाचे निर्माते वाय रवी शंकर (Y Ravi Shankar) यांनीच याबाबत मोठा खुलासा केला आहे. (Pushpa 2 Movie News Updates)

Pushpa 2 Movie News Updates
नात्यांवर भाष्य करणारा 'डियर मॉली'.. ट्रेलर व्हायरल

'पुष्पा' चित्रपटामध्ये अभिनेता अल्लू अर्जुननं (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandana) प्रमुख भूमिकेत होते. सध्या जिथे तिथे 'पुष्पा २' ची चर्चा आहे. त्यातही श्रीवल्लीचं काय याबाबत मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. अखेर पुष्पा चित्रपटाचे निर्माते वाय रवी शंकर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'पुष्पा २ मध्ये श्रीवल्लीचा मृत्यू होणार अशी चर्चा बाहेर पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून मीही ही ऐकून आहे. पण ही निव्वळ अफवा आहे. 'पुष्पा २' मध्ये श्रीवल्ली ही भूमिका असणार आहे. आता आम्ही चित्रपटाच्या तयारीत आहोत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये शूटिंगला सुरुवात होईल', असंही ते म्हणाले.

निर्मात्यांच्या या माहितीने प्रेक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाय लवकरच 'पुष्पा द रूल पार्ट 2' भेटीला येणार असल्याने आनंदही व्यक्त केला जात आहे. आयकॉन आणि AA21 हे अल्लू अर्जनचे आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पुष्पा हा चित्रपट 17 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता त्याचा दूसरा भाग कधी येणार याकडे संगल्याचे डोळे लागले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com