मारकुटी रविना 

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मार्च 2017

आपल्या चित्रपटात एखादे दृश्‍य खरे वाटावे यासाठी सगळेच कलाकार काहीना काही वेगळे करण्याचा प्रयत्न करत असतात. काही जण स्वतः ऍक्‍शन सीन्स करतात, तर काही जण डोळ्यात ग्लिसरीन न घालता रडायचा प्रयत्न करतात आणि बरेच काही. पण "मातृ' या चित्रपटात रविनाने आपल्या सहकलाकाराला चक्क एकदा नाही तर तीन वेळा थोबाडीत लगावली. त्यामुळे तिचा सहकलाकार मधुर मित्तल तिने पहिल्यांदा त्याला मारल्यावर सैरभैरच झाला. त्याला प्रचंड राग आला आणि जसा राग यायला पाहिजे होता तसेच दृश्‍य मिळाले.

आपल्या चित्रपटात एखादे दृश्‍य खरे वाटावे यासाठी सगळेच कलाकार काहीना काही वेगळे करण्याचा प्रयत्न करत असतात. काही जण स्वतः ऍक्‍शन सीन्स करतात, तर काही जण डोळ्यात ग्लिसरीन न घालता रडायचा प्रयत्न करतात आणि बरेच काही. पण "मातृ' या चित्रपटात रविनाने आपल्या सहकलाकाराला चक्क एकदा नाही तर तीन वेळा थोबाडीत लगावली. त्यामुळे तिचा सहकलाकार मधुर मित्तल तिने पहिल्यांदा त्याला मारल्यावर सैरभैरच झाला. त्याला प्रचंड राग आला आणि जसा राग यायला पाहिजे होता तसेच दृश्‍य मिळाले. मग रविनाने त्याला आणखी दोन वेळा थोबाडीत मारून आणखी दोन बाजूच्या अँगलने हे चित्रीकरण करण्यात आले, पण दृश्‍य चांगले होण्याच्या नादात बिचाऱ्या मधुरला रविनाच्या हातच्या तीन वेळा थोबाडीत खाऊन घ्याव्या लागल्या.