भोली पंजाबन रिचा येतेय... 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

रिचा चढ्‌डा परत एकदा भोली पंजाबन बनून सगळ्यांना टशन देणारेय. हां, बरोब्बर ओळखलंत! तीच ती "फुकरे रिटर्न्स'मध्ये परत एकदा भोली पंजाबन बनणार आहे. जी दिल्लीच्या फुकऱ्यांच्या शोधात असते. अशा या डॉनची भूमिका रिचा पुन्हा एकदा साकारणार आहे. पण या वेळी या भूमिकेचं असं वैशिष्ट्य आहे, की रिचा या चित्रपटात स्वतः ऍक्‍शन करणार आहे. त्यासाठी ती सध्या जोरदार तयारीला लागलीय. फीट राहण्याबरोबरच ती ऍक्‍शनही शिकत्येय. "फुकरे रिटर्न्स'चं शूटिंग सध्या सुरू आहेच.

रिचा चढ्‌डा परत एकदा भोली पंजाबन बनून सगळ्यांना टशन देणारेय. हां, बरोब्बर ओळखलंत! तीच ती "फुकरे रिटर्न्स'मध्ये परत एकदा भोली पंजाबन बनणार आहे. जी दिल्लीच्या फुकऱ्यांच्या शोधात असते. अशा या डॉनची भूमिका रिचा पुन्हा एकदा साकारणार आहे. पण या वेळी या भूमिकेचं असं वैशिष्ट्य आहे, की रिचा या चित्रपटात स्वतः ऍक्‍शन करणार आहे. त्यासाठी ती सध्या जोरदार तयारीला लागलीय. फीट राहण्याबरोबरच ती ऍक्‍शनही शिकत्येय. "फुकरे रिटर्न्स'चं शूटिंग सध्या सुरू आहेच. पण तिचा हा ऍक्‍शन धमाका या चित्रपटाच्या शेवटच्या सीन्समध्ये बघायला मिळणार आहे आणि हे सीन तिला स्वतःला करायचे असल्याकारणाने सध्या ती यासाठी आठवड्यातून तीन वेळा प्रशिक्षणासाठी जातेय.