रिचा चड्ढा बनणार 'क्वीन्स ऑफ कॉमेडी'ची परीक्षक

टीम ई सकाळ
शुक्रवार, 28 जुलै 2017

सिने अभिनेत्री रिचा चड्ढा हिने आजवर मोठ्या पडद्यावर साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ती आता छोट्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली असून 'क्वीन्स ऑफ कॉमेडी' या महिला कॉमेडीयन्सना व्यासपीठ मिळवून देणा-या भारतातील पहिल्यावहिल्या महिला कॉमेडी शोमध्ये परीक्षकांची भूमिका निभावणार आहे. यात तिच्या जोडीला असणार आहेत एआयबीचा फनी मॅन रोहन जोशी आणि कॉमेडियन कानीझ सुर्का.

मुंबई : सिने अभिनेत्री रिचा चड्ढा हिने आजवर मोठ्या पडद्यावर साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ती आता छोट्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली असून 'क्वीन्स ऑफ कॉमेडी' या महिला कॉमेडीयन्सना व्यासपीठ मिळवून देणा-या भारतातील पहिल्यावहिल्या महिला कॉमेडी शोमध्ये परीक्षकांची भूमिका निभावणार आहे. यात तिच्या जोडीला असणार आहेत एआयबीचा फनी मॅन रोहन जोशी आणि कॉमेडियन कानीझ सुर्का.

क्वीन्स ऑफ कॉमेडीमध्ये प्रतिभावंत महिला कॉमेडीयन्सना सर्वोत्तम प्रतिभेसोबत स्पर्धा करण्यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण मंच मिळेल आणि त्या सिद्ध करू शकतील की मनोरंजन करताना व हसवताना त्या पुरुषांच्या तोडीस तोड आहेत. ह्या शोची सुरुवात 24 सप्टेंबरपासून होईल व तो प्रत्येक वीकएंडला रात्री 10 वाजता फक्त टीएलसी चॅनलवर प्रस्तुत केला जाईल.       
 
ह्या शोविषयी बोलताना रिचा चड्ढा म्हणाली, “आपल्या समाजातील महिलांकडून शांत, योग्य वर्तनाची आणि सौम्य भुमिका घेतली जाण्याची अपेक्षा असते आणि पुरुषांना आक्रमकपणे ठाम मते मांडण्यासाठी व त्वेषाने बोलण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळेच मग भारतामध्ये कॉमेडी क्षेत्रात महिलांचे प्रमाण फार कमी आहे, ह्यात आश्चर्य नाही. मला वाटते की, इथे गुंतवणुकीचा अभाव आहे व त्यांच्या प्रतिभेला व्यक्त होण्याची संधी देणारे मंच फार कमी आहेत. भारतातील आजवरचा टिव्हीवरील पहिलाच महिलांचा कॉमेडी शो आणण्याच्या टीएलसीचा पुढाकार ही कमतरता दूर करण्याच्या दिशेने उचललेले मोठे पाऊल आहे. ह्या नावीन्यपूर्ण अशा शोचा भाग होताना मला अतिशय आनंद होत आहे.”