१७ वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू

टीम ई सकाळ
गुरुवार, 1 जून 2017

मराठी चित्रपटसृष्टीत नुकतंच पाऊल ठेवलेल्या अस्मिता मोरे या अभिनेत्रीचा अत्यंत दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. पेटले मन सारे या चित्रपटाचं शूटींग संपवून निलंग्याकडे परत येत असताना हा अपधात झाला.

कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीत नुकतंच पाऊल ठेवलेल्या अस्मिता मोरे या अभिनेत्रीचा अत्यंत दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. पेटले मन सारे या चित्रपटाचं शूटींग संपवून निलंग्याकडे परत येत असताना हा अपधात झाला.

स्मिता गेल्या १८ दिवसांपासून या सिनेमासाठी शूटिंग करत होती. ती बारावीची विद्यार्थिनी होती. हा तिचा पहिलाच चित्रपट होता. अस्मिता ही मूळची निलंग्याची असून तिचे वडील प्राध्यापक आहेत.

या चित्रपटाचं शूटींग सावरी गावाजवळ सुरू होते. तिथून निलंग्याकडे परत येत असतानाच हा अपघात झाला. अस्मितासोबत तिचा भाऊ सुरदर्शन कदम होता. मात्र एअर बँगमुळे त्याचा जीव वाचला आहे.