रोहन भटनागरचं हृतिकला पत्र 

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मार्च 2017

"काबील' चित्रपटात हृतिक रोशन "सुपर हिरो'ऐवजी एका सर्वसामान्य; पण दृष्टिहीन अशा रोहन भटनागरच्या भूमिकेत दिसला. रोहन भटनागर हे नाव खूप सामान्य होतं. सहसा मल्होत्रा, मखीजा, कपूर आदी बडी बडी नावं हिरोसाठी वापरली जातात; पण रोहन नावामुळे हृतिकने सामान्यांच्या मनातही घर केलंय. "काबील'साठी हृतिकच्या अनेक फॅन्सनी त्याचं कौतुक केलं. अनेकांनी त्याला पत्रं पाठवली... त्यातलं एक हृतिकसाठी खास ठरलं. ते होतं, खऱ्याखुऱ्या रोहन भटनागरचं... रांचीत राहणाऱ्या रोहन भटनागर नावाच्या एका सामान्य मुलाने हृतिकला पत्र पाठवलंय. त्यात तो म्हणतो, "मला माझं नाव कधीच आवडलं नाही.

"काबील' चित्रपटात हृतिक रोशन "सुपर हिरो'ऐवजी एका सर्वसामान्य; पण दृष्टिहीन अशा रोहन भटनागरच्या भूमिकेत दिसला. रोहन भटनागर हे नाव खूप सामान्य होतं. सहसा मल्होत्रा, मखीजा, कपूर आदी बडी बडी नावं हिरोसाठी वापरली जातात; पण रोहन नावामुळे हृतिकने सामान्यांच्या मनातही घर केलंय. "काबील'साठी हृतिकच्या अनेक फॅन्सनी त्याचं कौतुक केलं. अनेकांनी त्याला पत्रं पाठवली... त्यातलं एक हृतिकसाठी खास ठरलं. ते होतं, खऱ्याखुऱ्या रोहन भटनागरचं... रांचीत राहणाऱ्या रोहन भटनागर नावाच्या एका सामान्य मुलाने हृतिकला पत्र पाठवलंय. त्यात तो म्हणतो, "मला माझं नाव कधीच आवडलं नाही. माझ्या घरचे सोडले तर ते फारसं कोणाला आवडतही नव्हतं. मला माझे मित्र भटनागर अशी हाक मारायचे. तेही मला आवडायचं नाही; पण "काबील'मध्ये तू रोहन भटनागर हे नाव वापरलं अन्‌ माझं आयुष्य बदललं. "काबील' प्रदर्शित झाल्यानंतर माझं नाव घेताना माझ्या मित्रांच्या चेहऱ्यावर हसू असतं. त्यामुळे आता मलाही माझं नाव आवडू लागलंय. मी तुझा अजिबात फॅन वगैरे नाहीए... पण तू माझं नाव वापरलेस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद...' रोहनच्या पत्राने हृतिक सुखावला. तो म्हणतो, "काबील'मधील माझ्या भूमिकेचं महत्त्व चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच मला समजलं. मी अनेकांशी कनेक्‍ट झालो. सर्वात मोठा आनंद म्हणजे फॅन्स माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. रोहन भटनागरचं पत्र मी आयुष्यात विसरणार नाही.' 

Web Title: rohan bhatnagar writes a letter hrithik roshan