रोहित खंडेलवाल पहिला भारतीय 'मिस्टर वर्ल्ड'

पीटीआय
बुधवार, 20 जुलै 2016

नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘मिस्टर वर्ल्ड‘ हा किताब हैदराबादच्या रोहित खंडेलवालच्या याच्या रुपाने यावर्षी पहिल्यांदाच भारतीयाने पटकाविला आहे. साऊथपोर्ट येथील  साऊथपोर्ट थिएटरमध्ये काल (मंगळवार) मोठ्या उत्साहात ‘मिस्टर वर्ल्ड 2016‘चा कार्यक्रम पार पडला. 

‘मिस्टर वर्ल्ड 2016‘च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या भव्य सोहळ्याची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या स्पर्धेत जगभरातील एकूण 47 स्पर्धक सहभागी झाले होते. रोहित खंडेलवाल याने या किताबासह 50 हजार डॉलरचे पोरितोषिक मिळविले. 

निवेदिता साबू यांनी डिझाईन केलेला टक्सिडो रोहितने यावेळी परिधान केला होता. मिस्टर वर्ल्ड जिंकून अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल रोहित खंडेलवाल याच्यावर भारतीयांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

फोटो गॅलरी
व्हिडीओ गॅलरी