रोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

आपल्या अकदमीविषयी माहिती देताना रोहित म्हणतो, लातूरला संगीताचं ज्ञान असलेल्या चांगल्या गुरूंची किंवा टॅलेंटची कमतरता नाही आहे. पण तरूण प्रतिभेला गायन क्षेत्रात करीयर करताना कॉन्फिडन्स देण्याची आणि त्यांच्या प्रतिभेला पैलू पाडण्याची गरज असते.

सध्याच्या युवापिढीवर आपल्या सुमधूर गीतांनी भुरळ घालणाऱ्या गायक रोहित राऊतने आता नव्या टॅलेंटला संधी मिळावी म्हणून आपल्या गावी लातूरला मर्म म्युझिक अकादमी सुरू केली आहे.

आपल्या अकदमीविषयी माहिती देताना रोहित म्हणतो, “लातूरला संगीताचं ज्ञान असलेल्या चांगल्या गुरूंची किंवा टॅलेंटची कमतरता नाही आहे. पण तरूण प्रतिभेला गायन क्षेत्रात करीयर करताना कॉन्फिडन्स देण्याची आणि त्यांच्या प्रतिभेला पैलू पाडण्याची गरज असते. मुंबईसारख्या महानगरात येऊन छोट्या गावातली किंवा शहरातली मुलं बुजून जातात. प्रतिभा असून मागे पडतात. अशावेळी मुंबईत करीयर करायला जाताना त्यांना ग्रुमिंग करण्याची आवश्यकता असल्याचं मला भासलं. आणि मर्म म्युझिक अकादमीचा जन्म झाला.”

Rohit Raut Music

या अकदामीचा शुभारंभ झाल्यावर ‘रोहित राऊत-जुईली जोगळेकर लाइव इन कॉन्सर्ट’चे आयोजन लातुरमध्ये करण्यात आले होते. रोहित म्हणतो,”या कॉन्सर्टला रसिकांचा भरूभरून प्रतिसाद मिळाला. ब-याचदा असं होते की, कलाकार मोठा झाल्यावर तो जन्मगावी जाणे कमी करतो. तसं माझ्याबाबतीत होऊ नये, हा माझा यामागचा मुळं उद्देश होता. मला माझ्या मातीसाठी काहीतरी करण्याची खुप इच्छा होती. रोहित राऊत फाऊंडेशनव्दारे मी अशा पध्दतीने समाजाची परतफेड करण्याचा माझा प्रयत्न राहिल.”

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Rohit Raut started Marma Music Academy