ऋतुजा पुन्हा एकदा टीव्हीवर 

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मार्च 2017

"सावर रे' या मालिकेनंतर ऋतुजा देशमुख छोट्या पडद्यावरून गायबच झाली होती. तिचा गोड चेहरा आणि बोलणे यामुळे तिने सगळ्यांची मने जिंकून घेतली होती. तोच गोड चेहरा पुन्हा एकदा आपल्याला टीव्हीवर दिसणार आहे. कलर्स वाहिनीवरील "तू माझा सांगाती' या मालिकेत ती आवलीची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत चिन्मय मांडलेकर संत तुकारामांची भूमिका साकारतोय. तर त्यांची पत्नी आवलीची भूमिका आता ऋतुजा देशमुख साकारणार आहे. ती म्हणते "आवलीची भूमिका साकारणं सोपं नाही. ही माझ्यासाठी एक आव्हानात्मक भूमिका आहे. तुकोबा हे अगदी शांत, साधे, विठोबाच्या भक्तीमध्ये स्वत:ला झोकून दिलेले आणि आवली अगदी त्यांच्याविरूद्ध आहे.

"सावर रे' या मालिकेनंतर ऋतुजा देशमुख छोट्या पडद्यावरून गायबच झाली होती. तिचा गोड चेहरा आणि बोलणे यामुळे तिने सगळ्यांची मने जिंकून घेतली होती. तोच गोड चेहरा पुन्हा एकदा आपल्याला टीव्हीवर दिसणार आहे. कलर्स वाहिनीवरील "तू माझा सांगाती' या मालिकेत ती आवलीची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत चिन्मय मांडलेकर संत तुकारामांची भूमिका साकारतोय. तर त्यांची पत्नी आवलीची भूमिका आता ऋतुजा देशमुख साकारणार आहे. ती म्हणते "आवलीची भूमिका साकारणं सोपं नाही. ही माझ्यासाठी एक आव्हानात्मक भूमिका आहे. तुकोबा हे अगदी शांत, साधे, विठोबाच्या भक्तीमध्ये स्वत:ला झोकून दिलेले आणि आवली अगदी त्यांच्याविरूद्ध आहे. आवली ही स्वभावाने स्पष्टोक्ती आणि व्यवहारी अशी होती. त्यामुळे अशा प्रकारची भूमिका करणे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं आणि मी या भूमिकेला योग्य न्याय द्यायचा प्रयत्न करेन.' ऋतुजा तब्बल तीन वर्षांनी छोट्या पडद्याकडे वळली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिला परत एकदा टीव्हीवर पाहायला नक्कीच मिळेल. 

टॅग्स