सचिनचा सिनेमा महाराष्ट्रात करमुक्त

टीम ई सकाळ
शुक्रवार, 26 मे 2017

सचिन तेंडुलकरच्या जीवनावर बेतलेला 'सचिन: अ बिलियन ड्रीम्स' हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकाारने घेतला आहे. हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्येत पोचावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

मुंबई: सचिन तेंडुलकरच्या जीवनावर बेतलेला 'सचिन: अ बिलियन ड्रीम्स' हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकाारने घेतला आहे. हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्येत पोचावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

ब्रिटिश दिग्दर्शक जेम्स एरस्किन यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या या सिनेमावर सचिनच्या चाहत्यांच्या उड्या पडत आहेत. आपल्या सचिनची ही गौरवास्पद गाथा सर्व लोकांना पाहता यावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ओरिसा, छत्तीसगड, केरळ या राज्यांनी हा सिनेमा करम़ुक्त केला आहे.