'सचिन : अ बिलियन ड्रीम्स' 26 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

सचिन तेंडुलकरने स्वतः ट्विटरवरून चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर करीत आपल्या चाहत्यांना ही 'गुड न्यूज' दिली आहे.

मुंबई- क्रिकेटचा देव म्हणून ज्याला उपाधी दिली जाते त्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित 'सचिन : अ बिलियन ड्रीम्स' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर निश्चित झाली आहे.  हा चित्रपट 26 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

या व्यक्तिरेखेवर आधारित या (बायोपिक) चित्रपटाचा ट्रेलर मागील वर्षी 14 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. तेव्हापासून सचिनचे चाहते चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. ट्रेलर प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर काही तासांतच 'सचिन : अ बिलियन ड्रीम्स'ची पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल झाली. यावरून क्रिकेट रसिकांमध्ये क्रिकेटच्या देवाबद्दल किती उत्सुकता आहे हे दिसून येते. 

सचिन तेंडुलकरने स्वतः ट्विटरवरून चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर करीत आपल्या चाहत्यांना ही 'गुड न्यूज' दिली आहे. "प्रत्येकजण मला जो प्रश्न विचारत आहे त्याचे उत्तर हे आहे. तुमची ही तारीख राखून ठेवा.  चित्रपट 26 मे रोजी प्रदर्शित होत आहे."