अंतर्वस्त्राविषयी सई ताम्हणकरचा मोठा खुलासा; म्हणाली,'मला आवडत नाही...'

सई ताम्हणकर सध्या आयफा पुरस्काराची मानकरी ठरली म्हणूनच नाही, तर तिच्या 'अंतर्वस्त्र' याविषयीच्या व्हिडीओमुळेही चर्चेत आहे.
Sai Tamhankar
Sai TamhankarInstagram

मराठीतील बोल्ड-हॉट अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरकडे(Sai Tamhankar) पाहिलं जातं. सई तिच्या बिनधास्त अॅटिट्युडमुळे देखील ओळखली जाते. सई ताम्हणकर हे नाव आता केवळ मराठीत नाही तर हिंदीतही चर्चेत आहे. तिनं साकारेलल्या भूमिकांनी अनेक पुरस्कार तिच्या नावावर केले आहेत. नुकताच सईला इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमीच्या आयफा पुरस्कार सोहळ्यात(IIFA 2022) 'मिमी' या सिनेमातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारामुळे सईची जितकी चर्चा होतेय तितकीच आता तिच्या एका व्हायरल व्हिडीमुळे चर्चा रंगतेय.(Sai Tamhankar Reaction on 'bra' Topic- video viral)

सोशल मीडियावर आपलं मत थेट व्यक्त करणारी सई ताम्हणकर काही पहिली अभिनेत्री नाही. फक्त मराठी अभिनेत्रीनं बोल्ड काहीतरी म्हटलं की नेटकऱ्यांना लगेच काटे टोचतात. कारण सोशल मीडियावर तर गेल्या काही दिवसांत वादग्रस्त वक्तव्य करुन अनेक कलाकार व्यक्त होताना दिसले आहे. त्यावरनं रंगलेल्या वादांची अनेकांनी मजा देखील अनुभवली आहे. असो,तो एक वेगळा मुद्दा आहे. आता सई ताम्हणकरनं सोशल मीडियावर चक्क आपल्या अर्तवस्त्रांबाबत मोठा खुलासा केला आहे. यासंदर्भातला एक व्हिडीओ तिनं आपल्या मैत्रिणीसोबत मिळून बनवलाय अन् शेअर केला आहे.

Sai Tamhankar
'धाकड' फ्लॉप झाल्यानंतर कंगनाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली,'अजूनही..'

सई ताम्हगणकरनं आपली मैत्रिण मालिनी अग्रवालसोबत मिळून एक व्हिडीओ(Video) शेअर केला आहे. हा व्हिडिओ म्हणजे एक इन्स्ट्रग्राम रिल आहे. त्यात 'तुम्ही तुमची आवडती ब्रा का धुत नाही?' असा प्रश्न व्हिडीओद्वारे विचारला गेलाय. त्यावर सई अ्न तिची मैत्रिण दोघी मिळून एका डायलॉगवर लिप्सिंग करताना दिसतायत. सई म्हणतेय,''मला आवडतं,खूप मजा येते''. सईचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

सई ताम्हणकर सध्या फॉर्मात आहे. मराठी-हिंदी सिनेमे,वेब सिरीजमधून सध्या ती आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत आहे. सई ताम्हणकर हे नाव यंदाच्या आयफा मध्ये दुमदुमलं ते तिला 'मिमि' सिनेमातील व्यक्तिरेखासाठी मिळालेल्या सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्कारानं. 'मिमि' हा सिनेमा 'मला आई व्हायचंय' या मराठी सिनेमाच्या कथानकावर आधारित होता. हिंदीतही या सिनेमाच्या कथानकाला अन् कलाकारांच्या अभिनयाला पसंती मिळाली होती. सिनेमानं बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता सईला या सिनेमासाठी मानाचा आयफा पुरस्कार मिळाल्यानं हिंदीतही तिची घौडदौड वेगात सुरु होईल यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com