'सीआयडी'च्या सेटवर पसरली शोककळा!

बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

बी.पी.सिंग यांना तातडीने याची माहिती देण्यात आली. बी.पी.सिंगही त्याच स्टुडिओमध्ये बाजूच्या भागात दुसऱ्या एका सीनचे शूट करण्यात व्यग्र होते. सलीलच्या जाण्याने सिंग कुटुंबीय कमालीचे धक्क्यात आहेत. तर सीआयडीचा सर्वच परिवार शोकमग्न झाला आहे. अवघ्या 30 व्या वर्षी सलीलचा असा मृत्यू व्हावा हे कुणालाच न पटणारे होते हे सेटवरील एका व्यक्तीने सांगितले. 

निर्माते बी.पी.सिंग यांच्या मुलाचे सेटवरच निधन

मुंबई : एरवी सीआयडी मालिकेचे शूट असले की सर्व कलाकार खुशीत असतात. या मालिकेची घडी इतकी छान बसली आहे की अत्यंत नियोजनबद्ध रीतीने याचे चित्रिकरण चालते. पण बुधवार मात्र सर्व सीआयडी परिवारासाठी घातवार ठरला. कारण या मालिकेचे निर्माते बी.पी.सिंग यांच्या मुलाचे सलील सिंगचे अवघ्या तिसाव्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने सीआयडीच्या सेटवरच निधन झाले आणि मीरा रोड येथील स्टुडीओत एकच शोककळा पसरली. 

बुधवारी नेहमीप्रमाणे सर्व सीआयडीचे युनिट शूट करत होते. सलील सिंगही या शूटला आला होता. तो त्याच्या पत्नीसह सीआयडीमधील काही भाग शूट करत होता. सर्वत्र काम उत्साहात सुरू होते. सलीलही अत्यंत तल्लीन होऊन एक सीन शूट करत होता. त्याची पत्नी आणि त्याचे संभाषणही सुरू होते. ते सुरू असताना दहा मिनिटांचा ब्रेक झाला. सलील तोंड धुवायला म्हणून बाथरूममध्ये गेला. बराचवेळ झाला पण बाथरूमचा दरवाजा न उघडल्याने आजुबाजूच्या लोकांना शंका आली. त्यांनी तातडीने हा दरवाजा तोडला तर आत सलील बेसीनच्या खाली निपचित पडला होता, कारण हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्याचे निधन झाले होते. सर्वच युनिटसाठी हा मोठा धक्का होता. 

टॅग्स