सलमान-कतरिनाच्या चाहत्यांसाठी खुशखबर! 

वृत्तसंस्था
शनिवार, 1 एप्रिल 2017

बॉलीवूडचा दबंग खान सलमान व बार्बी गर्ल कतरिना कैफ "एक था टाइगर' चित्रपटानंतर तब्बल पाच वर्षांनंतर आता "टाइगर जिंदा है'मध्ये दिसणार आहेत. हे दोघं सध्या ऑस्ट्रीयामध्ये या सिनेमाचं शूटिंग करताहेत. यात सलमान कोल्ह्यांसोबत डेंजर स्टंट करताना दिसणारेय. निर्मात्यांना टाइगर जिंदा है सिनेमाला इंटरनॅशनल टच द्यायचा आहे. यातील सल्लूचा अवतार एकदम निराळा असणार आहे. त्यात सलमान व कतरिनाची केमिस्ट्रीही पाहायला मिळेल. त्याचबरोब सलमान व कतरिनाच्या चाहत्यांसाठी अजून एक खुशखबर आहे. हे दोघं अतुल अग्निहोत्रीच्या चित्रपटात काम करणार असल्याचं बोललं जातंय.

बॉलीवूडचा दबंग खान सलमान व बार्बी गर्ल कतरिना कैफ "एक था टाइगर' चित्रपटानंतर तब्बल पाच वर्षांनंतर आता "टाइगर जिंदा है'मध्ये दिसणार आहेत. हे दोघं सध्या ऑस्ट्रीयामध्ये या सिनेमाचं शूटिंग करताहेत. यात सलमान कोल्ह्यांसोबत डेंजर स्टंट करताना दिसणारेय. निर्मात्यांना टाइगर जिंदा है सिनेमाला इंटरनॅशनल टच द्यायचा आहे. यातील सल्लूचा अवतार एकदम निराळा असणार आहे. त्यात सलमान व कतरिनाची केमिस्ट्रीही पाहायला मिळेल. त्याचबरोब सलमान व कतरिनाच्या चाहत्यांसाठी अजून एक खुशखबर आहे. हे दोघं अतुल अग्निहोत्रीच्या चित्रपटात काम करणार असल्याचं बोललं जातंय. जर हे खरं ठरलं तर सलमान व कतरिनाच्या चाहत्यांसाठी ही मोठी ट्रीट ठरेल.