सलमानची मालिका 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

गामा पहेलवानावर चित्रपट बनवण्याची कल्पना बॉलीवूडचा दंबग खान सलमानच्या डोक्‍यात बऱ्याच दिवसांपासून फिरतेय.

सोहेल खानला मुख्य भूमिकेत घेऊन चित्रपट बनवण्याचा त्याचा विचार होता. मात्र ही कल्पना आता चित्रपटाच्या माध्यमात रूपांतरित होणार नाहीये. मध्यंतरी जॉन अब्राहमनंदेखील गामा पहेलवानावर चित्रपट बनवण्याचं बोलून सल्लूमियॉंसोबत पंगा घेतला होता. मात्र जॉन व सलमान दोघंही सिनेमा बनवू शकले नाहीत. मात्र आता असं समजतंय, की सलमान गामा पहेलवानावर टीव्ही सीरिज बनवणार आहे.

याचं पायलट चित्रीकरणही झालंय आणि एका वाहिनीला पाठवलंय. जर वाहिनीकडून हिरवा कंदील मिळाला तर या प्रोजेक्‍टच्या कामाला सुरुवात होईल. या सीरिजमध्ये सोहेल गामा पहेलवानाच्या भूमिकेत पाहायला मिळेल.