बिग बाॅस 11.. स्पर्धक असणार 12

टीम ई सकाळ
रविवार, 20 ऑगस्ट 2017

बिग बाॅसचा अकरावा सीझन आता लवकरच येणार आहे. त्याचा नुकताच टीजर लाॅंच झाला. यात मुख्य अॅंकर म्हणून सलमान खानच असणार आहे. या शोमध्ये 12 स्पर्धक असणार आहेत, त्याचं सुतोवाच सलमाननेच या टीजरमध्ये केले आहे.

मुंबई : बिग बाॅसचा अकरावा सीझन आता लवकरच येणार आहे. त्याचा नुकताच टीजर लाॅंच झाला. यात मुख्य अॅंकर म्हणून सलमान खानच असणार आहे. या शोमध्ये 12 स्पर्धक असणार आहेत, त्याचं सुतोवाच सलमाननेच या टीजरमध्ये केले आहे.

हा शो नेमका कधी सुरू होणार, लोकांचं लक्ष पुन्हा या शोकडे वेधण्यासाठी यात काय काय आयडिया लढवल्या जाणार आहेत, त्यावर मात्र कोणतंही भाष्य यात करण्यात आलेलं नाही. पण हा शो आणखी रंजक असेल याची ग्वाही देण्यात आली आहे. हा टीजर बनवतानाही सलमान आणि लग्न यांना टारगेट करण्यात आलं आहे. तू आता लग्न कर असं शेजारची गृहिणी त्याला म्हणते, अशावर तू जर लग्न केलं नसतंस तर मी तुझ्याशी लग्न केलं असतं असं सांगून तो हा विषय हसत हसत टाळतो. नव्या शोची सगळी तयारी पूर्ण झाली असून आता हा अकरावा सीझन नक्की लोकप्रिय ठरतो की पु्न्हा याचा टिआरपी घसरतो ते पाहाणं उत्सुकतेचं ठरतं.  

Web Title: salman khan hosting big boss 11 season esakal news

टॅग्स