ट्युबलाईट झळकणार पाकिस्तानात. तारीख मात्र अनिश्चित.

टीम ई सकाळ
गुरुवार, 15 जून 2017

सलमान खानचा ट्युबलाईट हा सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित करायची जोरदार तयारी चालू आहे. या बाबतची माहीती सलमान खान फिल्मसचे सीओओ यांनी दिली आहे. हा सिनेमा पाकिस्तानात इदला प्रदर्शित होणार की नाही, यावर मात्र आत्ता बोलता येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मुंबई ; सलमान खानचा ट्युबलाईट हा सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित करायची जोरदार तयारी चालू आहे. या बाबतची माहीती सलमान खान फिल्मसचे सीओओ यांनी दिली आहे. हा सिनेमा पाकिस्तानात इदला प्रदर्शित होणार की नाही, यावर मात्र आत्ता बोलता येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. 

सलमानचा मोठा चाहता वर्ग पाकिस्तानात आहे. त्याच्या बजरंगी भाईजानला तिकडे कमालीचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता सलमान स्वत: हा चित्रपट जगभरात वितरीत करायच्या तयारीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ट्युबलाईट या सिनेमाचे पोस्टर न्यूयाॅर्क येथील टाईम्स स्क्वेअर येथे लावण्यात आले आहे. असा मान मिळणारा हा पहिलाच सिनेमा ठरला आहे. 

आपला सिनेमा जगभरातल्या चाहत्यांना पाहता यावा म्हणून सलमान खान विशेष कष्ट घेताना दिसतो. याबद्दल बोलताना त्याच्या निर्मिती संस्थेचे सीओओ संजय भूटाला म्हणाले, आम्हाला हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित करायचा आहे. तो तिंथे प्रदर्शित होईल यात शंका नाही. पण त्याची तारीख अद्याप ठरलेली नाही. पाकिस्तानी कायदे व त्यांच्या चित्रपट उद्योगामध्ये सुरु असलेल्या घडामोडींवर आम्ही नजर ठेवून आहोत. त्यांच्या सर्व कायद्यांचे आम्ही पालन करू.