'श्वास'चे दिग्दर्शक संदीप सावंत यांच्याशी लाईव्ह गप्पा

टीम ई सकाळ
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

श्वास हा चित्रपट 2003 मध्ये आला आणि मराठी चित्रपटाला नवी संजीवनी मिळाली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतासह परदेशातही या चित्रपटाने नाव कमावले. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक संदीप सावंत यांचे नाव प्रत्येकाच्या तोंडी आले.

पुणे: श्वास हा चित्रपट 2003 मध्ये आला आणि मराठी चित्रपटाला नवी संजीवनी मिळाली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतासह परदेशातही या चित्रपटाने नाव कमावले. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक संदीप सावंत यांचे नाव प्रत्येकाच्या तोंडी आले. 

पुढेपुढे जेव्हा केव्हा मराठी चित्रपटाची चर्चा होई तेव्हा तेव्हा श्वासचा आणि पर्यायाने दिग्दर्शक संदीप सावंत यांचा उल्लेख व्हायचा. पण 2003 नंतर मात्र सावंत यांना चित्रपट बनवायला लागली ती 14 वर्षे. आता त्यांचा नदी वाहाते हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. संदीप सावंत इतकी वर्षे नेमके काय करत होते, एक यशस्वी चित्रपट दिल्यानंतर पुन्हा चित्रपट काढायला त्यांना इतकी वर्षे का लागली. या नदी वाहाते या चित्रपटात नेमके काय आहे, अशा अनेक मुद्द्यांबर सावंत बोलते होणार आहेत ते ई सकाळच्या फेसबुक पेजवर. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता सावंत लाईव्ह येणार आहेत. 

या गप्पांवेळी रसिकांनाही सावंत यांच्याशी संवाद साधता येणार आहे, त्यातल्या निवडक प्रश्न थेट या दिग्दर्शकापर्यंत पोहोचवता येतील. 

संदीप सावंत यांच्याशी लाईव्ह गप्पा. बुधवारी, सकाळी साडेअकरा वाजता.