भन्साळी पिग्गीवर नाराज 

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 जून 2017

बॉलीवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्रावर निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सध्या नाराज असल्याचं समजतंय. प्रियंकाने संजय लीला भन्साळींसोबत "बाजीराव मस्तानी' आणि "मेरी कोम'सारख्या चित्रपटात काम केलेले आहे.

आता भन्साळीने प्रियंकासोबत अमृता प्रीतम यांच्या जीवनावर आधारित "गुस्ताखियां' नामक चित्रपट बनवण्याचे ठरवले होते. हा प्रोजेक्‍ट भन्साळींसाठी खूप खास आहे. या सिनेमासाठी भन्साळींनी अभिनेता इरफान खानला राजीदेखील केले. सर्व काही ठरवूनदेखील अजून चित्रीकरणाला सुरुवात झाली नाही.

कारण प्रियंकाकडे चित्रीकरणासाठी वेळ नाही. पिग्गीला हॉलीवूडमध्ये काही चित्रपट मिळालेत आणि क्वांटिकोही सुरू आहे. अशात तिच्याकडे "गुस्ताखियां'साठी वेळ नाही. तसंच तिला या चित्रपटात कामदेखील करायचंय. त्यात भन्साळींना प्रतीक्षा करायला अजिबात आवडत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रियंकासोबत भन्साळी एकदा गांभीर्याने बोलणार आहेत.