ई सकाळ विशेष: छोट्या पडद्यावर संतोष जुवेकरचे मानधन सर्वाधिक?

टीम ई सकाळ
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

मिळणारी लोकप्रियता आणि एकदा मालिका मिळाल्यानंतर येणारं स्थैर्य लक्षात घेऊन अनेक कलाकारांनी छोट्या पडद्यावर काम करायचं असतं. या मालिका पदरी प़डल्यानंतर कलाकारांच्या नशिबी ग्लॅमर आणि पैसा दोन्ही मुबलक येतं.  अर्थात त्यासाठी या कलाकारांनी जवळपास 14 तास रोजचं कामही करावं लागतं. आज छोट्या पडद्यावर अनेक मालिका गाजताहेत. यामध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या कलाकारात अभिनेता संतोष जुवेकर सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार ठरल्याचं वृत्त आहे. 

मुंबई : मिळणारी लोकप्रियता आणि एकदा मालिका मिळाल्यानंतर येणारं स्थैर्य लक्षात घेऊन अनेक कलाकारांनी छोट्या पडद्यावर काम करायचं असतं. या मालिका पदरी प़डल्यानंतर कलाकारांच्या नशिबी ग्लॅमर आणि पैसा दोन्ही मुबलक येतं.  अर्थात त्यासाठी या कलाकारांनी जवळपास 14 तास रोजचं कामही करावं लागतं. आज छोट्या पडद्यावर अनेक मालिका गाजताहेत. यामध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या कलाकारात अभिनेता संतोष जुवेकर सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार ठरल्याचं वृत्त आहे. 

काही महिन्यांपूर्वी कलर्स मराठीवर येणाऱ्या अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेतून अचानक यश महाजन अर्थात संतोष जुवेकर गायब झाला होता. मालिकेच्या ट्रॅकवर त्याचा मृत्यू दाखवण्यात आला होता. हा प्रकार झाल्यानंतर संतोषनेही त्याच्या वाॅलवर यापुढे आपल्याला यश महाजन दिसणार नसल्याचे सांगितलं होतं. इतके दिवस संतोष शिवाय ही मालिका सुरू होती. पण लोकआग्रह लक्षात घेता, संतोषला मालिकेच्या निर्मात्यांनी पुन्हा बोलावलं आहे. म्हणूनच आता या मालिकेत यश महाजनचा लूक अलाईक म्हणून दिग्विजय या व्यक्तिरेखेचा प्रवेश या मालिकेत झाला आहे. आणि दिग्विजयच्या रूपाने संतोष पुन्हा एकदा या मालिकेत आला आहे. सेटवरून आलेल्या माहितीनुसार पुन्हा या मालिकेत येताना संतोष निवडक आठच दिवस देणार आहे. इतकंच नव्हे, तर मालिकेचा ट्रॅक आणि संतोषची लोकप्रियता लक्षात घेऊन त्याला पुन्हा एंट्री देताना, त्याच्या प्रतिदिन मानधनातही वाढ करण्यात आली आहे. सेटवर मिळालेल्या माहितीनुसार 23 हजार ते 26 हजार या दरम्यान त्याचा पर डे पोहोचला आहे. 

यामुळे छोट्या पडद्यावर नायकांमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार संतोष जुवेकर ठरला आहे, अशी चर्चा छोट्या पडद्यावरच्या वर्तुळात आहे. याला अधिकृत दुजोरा मात्र कोणी द्यायला तयार नाही. 

मृणाल दुसानिसनेही घेतला निरोप

या मालिकेत संतोषप्रमाणेच काही दिवसांपूर्वी या मालिकेतून मृणाल दुसानिसनेही या मालिकेचा निरोप घेतला. अत्यंत व्यक्तिगत कारणामुळे तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. तो घेण्यापूर्वी तिने मालिकेच्या सर्व कलाकारांना, निर्मात्यांना, चॅनलच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेंतलं. त्यानंतर परस्पर संमतीने तिने ही मालिका सोडल्यानंतर तिची जागा घेतली ती सायली पाटील या अभिनेत्रीने.