सविता प्रभुणेंचा हिंदी मालिकेत प्रवेश 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

पवित्र रिश्‍ता मालिकेतील सुलोचना या प्रेमळ आईच्या भूमिकेतून रसिकांना आपलेसे करणाऱ्या अभिनेत्री सविता प्रभुणे दीर्घकाळ हिंदी टेलिव्हिजनवर दिसल्या नव्हत्या; मात्र आता त्या लाईफ ओके वाहिनीवरील "इंतकाम एक मासूम का' या मालिकेद्वारे हिंदी छोट्या पडद्यावर पुनरागमन करीत आहेत.

या मालिकेत अविनाश सचदेव, मानव गोहील, रिकी पटेल यांसारखे अनेक नामवंत टीव्ही कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. त्यात सविता अविनाशच्या आईच्या भूमिकेत दिसतील. याबद्दल सविता यांनी सांगितलं, की "लाईफ ओके'वरील "इंतकाम एक मासूम का' या आगामी मालिकेद्वारे मी तीन वर्षांनी हिंदी टीव्हीच्या पडद्यावर पुन्हा एकदा दिसणार आहे. गेली तीन वर्षे मी मराठी मालिकांमध्ये व्यग्र असल्यामुळे हिंदी मालिकांपासून दूर राहिले होते, पण आता या नव्या मालिकेद्वारे मी माझ्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यास पुन्हा एकदा सज्ज झालेय. या मालिकेची संकल्पना अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रेक्षकांना माझी भूमिका पसंत पडेल आणि ते माझ्यावर पूर्वीच्या मालिकांइतकेच यापुढेही प्रेम करीत राहतील अशी मला आशा आहे.'