रश्मी गडावर पोचली अन 'कुलस्वामिनी' प्रसन्न झाली

टीम ई सकाळ
सोमवार, 31 जुलै 2017

स्टार प्रवाहवरील 'कुलस्वामिनी' या मालिकेत रेणुकामातेचा महिमा आणि श्रद्धा-अंधश्रद्धेचा संघर्ष दाखवला जात आहे. या मालिकेचा सेट गोरेगावला असला तरी, प्रमुख भूमिका साकारणाऱ्या रश्मी अनपटला कीर्तनाच्या कार्यक्रमानिमित्त  माहूरगडावर जायचा योग आला. रेणुका मातेच्याच माहुरगडावर रश्मीने दैवी अनुभूती घेतली. देवीच्याच दारात तिला निसर्गाचा नेत्रदीपक असा चमत्कार नुकताच अनुभवायला मिळाला, जणू काही डिव्हाईन इंटरव्हेन्शन.

मुंबई : स्टार प्रवाहवरील 'कुलस्वामिनी' या मालिकेत रेणुकामातेचा महिमा आणि श्रद्धा-अंधश्रद्धेचा संघर्ष दाखवला जात आहे. या मालिकेचा सेट गोरेगावला असला तरी, प्रमुख भूमिका साकारणाऱ्या रश्मी अनपटला कीर्तनाच्या कार्यक्रमानिमित्त  माहूरगडावर जायचा योग आला. रेणुका मातेच्याच माहुरगडावर रश्मीने दैवी अनुभूती घेतली. देवीच्याच दारात तिला निसर्गाचा नेत्रदीपक असा चमत्कार नुकताच अनुभवायला मिळाला, जणू काही डिव्हाईन इंटरव्हेन्शन.

माहूरमध्ये दिवसा कडाक्याचं ऊन होतं. मात्र, संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. अडीचशे पायऱ्या चढून गडावर जायचं तिला अवघड वाटत नव्हतं. मात्र, वातावरणामुळे नियोजित कार्यक्रम पार पडणार की नाही अशी धास्ती होती. ती सहजच गडावर पोहोचली. मंदिरात गेल्यावर देवीचं दर्शन घेऊन तिला प्रसन्न वाटलं. देवीची तेजस्वी मूर्ती पाहून मन खूप शांत झालं. कार्यक्रम पार पडताच क्षणार्धात वातावरण बदललं. तुफान वारा सुटला, विजेचा कडकडाट झाला आणि गारांचा पाऊस सुरू झाला. कार्यक्रम अगदी वेळेवर पार पडल्यामुळे, रश्मीचा आणि आयोजकांचा जीव भांड्यात पडला. 
'वातावरणातला तो बदल अगदीच दैवी अनुभूतीसमान होता. कार्यक्रम संपल्यावरच पाऊस पडणं हा नक्कीच योगायोग नव्हता. हे बहुदा डिव्हाईन इंटरव्हेन्शन असावं!' असं रश्मीनं सांगितलं.