राजकुमार रावच्या लग्नासाठी दोन कोटी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

राजकुमार रावच्या लग्नासाठी दोन कोटी रुपये खर्च होणार आहेत. हे त्याचे प्रत्यक्षातील लग्न नसून आगामी "शादी में जरूर आना' या चित्रपटातले आहे.

त्यासाठी लखनऊत सुमारे दोन कोटी रुपयांचा सेट उभारण्यात आला आहे. कला दिग्दर्शक अरुप अधिकारी यांनी सेट डिझायनर शबीउल हसन यांच्या टीमसोबत सलग तीन दिवस काम करून हा सेट उभारला. अन्य बॉलीवूड चित्रपटांतील लग्नाच्या सेटपेक्षा हा सेट खूप वेगळा आहे. रत्ना सिन्हा दिग्दर्शित या चित्रपटात राजकुमार राव आणि कृती खरबंदा यांच्या मुख्य भूमिका आहेत. 