शाहरुख व अक्षय ठरले "हायेस्ट पेड' स्टार

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 जुलै 2016

न्यूयॉर्क - बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान व स्टंट अभिनेता अक्षय कुमार हे सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार ठरले आहेत. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या जगातील सेलिब्रिटींची 2016 मधील यादी "फोर्ब्स‘ने जाहीर केली आहे. त्याच अमेरिकेची प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्टने पहिले स्थान पटकाविले आहे. तिचे मानधन 17 कोटी डॉलर आहे. 

शाहरुख खान तीन कोटी 30 लाख डॉलर मानधनासह यादीत 86 व्या स्थानावर आहे तर अक्षय कुमार तीन कोटी 15 लाख डॉलरसह 94 व्या क्रमांकावर आहे. शाहरुख खानने गेल्या काही वर्षांत अनेक हिट चित्रपट दिले असून बॉक्‍स ऑफिसवर अजूनही त्याची चलती असल्याचे दिसते असे "फोर्ब्स‘ने म्हटले आहे. शाहरुख एका चित्रपटासाठी लाखो डॉलर कमवीत असून चित्रपटातील भूमिकेसाठी तो कष्टही घेतो, अशा शब्दात त्याचे कौतुक केले आहे. चित्रपटाशिवाय अनेक कंपन्यांच्या जाहिराती तो करीत असून त्यातील अनेक अमेरिकन ब्रॅंड आहेत. यातून शाहरुखची मोठी कमाई होते, असेही म्हटले आहे. 

चित्रपटातील स्टंटसाठी प्रसिद्ध असलेल्या अक्षय कुमारच्या क्रमांकात यावर्षी घसरण झाली आहे. 2015मधील यादीत तो 76 व्या स्थानावर होता.यंदा तो 94 व्या स्थानावर गेला आहे. अक्षय हा बॉलिवूडमधील सर्वांत व्यग्र अभिनेता असून तीन हीट चित्रपटांमधून त्याने सर्वाधिक कमाई केली असल्याचे "फोर्ब्स‘ने म्हटले आहे.

Web Title: Shah Rukh Khan and Akshay Kumar are highest paid stars