शाहरूख खानच्या मुलासाठी ट्री हाऊस 

वृत्तसंस्था
सोमवार, 9 जानेवारी 2017

शाहरूख खानचा मुलगा अब्राम याचे लाड गौरी आणि शाहरूख मोठ्या हौसेने पुरवताना दिसत आहेत. छोट्या अब्रामसाठी आता एक ट्री हाऊस पण बनवण्यात आले आहे. गौरीने नुकतेच सोशल मीडियावर फोटो टाकून हे सांगितले.

शाहरूख खानचा मुलगा अब्राम याचे लाड गौरी आणि शाहरूख मोठ्या हौसेने पुरवताना दिसत आहेत. छोट्या अब्रामसाठी आता एक ट्री हाऊस पण बनवण्यात आले आहे. गौरीने नुकतेच सोशल मीडियावर फोटो टाकून हे सांगितले.

ट्री हाऊसची रचना हुबेहुब एखाद्या छोट्या घरासारखी करण्यात आलीय. या घरात जायला अब्रामसाठी छोट्या पायऱ्या ही करण्यात आल्या आहेत. घराच्या आतही त्याला खेळण्यासाठी मोकळी जागा आहे. खेळणी ठेवण्यासाठी पण वेगळी जागा आहे. हे ट्री हाऊस साबू सायरिल यांनी साकार केले असून, त्यांनी शाहरूखच्या मन्नतसाठीही काम केलेले आहे. ते प्रॉडक्‍शन डिझायनर आहेत. गौरी खान स्वत: इंटिरियर डिझायनर असूनही तिने हे काम केलेलं नाही. अर्थातच तिला आपल्या मुलासाठी कोणा एक्‍सपर्टकडूनच हे काम करून घेणे जास्त पसंत पडले असावे... 
 

मनोरंजन

मुंबई : काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची लगबग प्रत्येक घराघरात आणि सार्वजनिक मंडळात आपल्याला पाहायला मिळते आहे. आपल्या...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

मुंबई : सन्मान स्त्रीच्या लढण्याचा , गौरव तिच्या भिडण्याचा हे ब्रीद घेऊन यावर्षीचा ‘उंच माझा झोका पुरस्कार’ दरवर्षीप्रमाणे...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

मुंबई : डेव्हीड धवन दिग्दर्शित जुडवा 2 ची प्रतिक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. कारण आज या सिनेमाचा ट्रेलर लाॅंच झाला. वरूण धवन...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017