आम्हाला आणखी एक मूल हवंय : शाहीद कपूर

टीम ई सकाळ
सोमवार, 17 जुलै 2017

मी आणि मीरा खुश आहोत. आता मिशा आमच्या आयुष्यात आल्यामुळे आळखी बरे वाटते. पण आता आम्ही दुसऱ्या बाळासाठी प्लॅनिंग करणार आहोत, अशी थेट कबूली दिली आहे ती शाहीद कपूरने. 

मुंबई : मी आणि मीरा खुश आहोत. आता मिशा आमच्या आयुष्यात आल्यामुळे आळखी बरे वाटते. पण आता आम्ही दुसऱ्या बाळासाठी प्लॅनिंग करणार आहोत, अशी थेट कबूली दिली आहे ती शाहीद कपूरने. 

शाहीदच्या लग्नानंतर मीरा आणि तो सतत चर्चेत होते. तो कुठेही भेटला की मीराबद्दल त्याच्याकडे विचारणा होते. एका शोमध्ये आल्यानंतर बोलताना तो म्हणाला, मी ज्यावेळी 18 वर्षाचा होतो, त्यावेळी मीरा पाच वर्षाची होती. वयात इतकी तफावत असलेल्या मुलीशी मी लग्न करेन असे मला त्यावेळी अजिबात वाटले नव्हते. पण आम्ही खुश आहोत. आता लवकरच आम्ही दुसऱ्या अपत्यासाठीही प्रयत्न करणार आहोत. 

 

टॅग्स