....आणि शाहिद बोलला 

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 मे 2017

नुकतीच मीरा राजपूत आणि तिची मुलगी मिशा या दोघी एका बेबी प्रॉडक्‍टसाठी जाहिरातीत एकत्र काम करणार अशी चर्चा सुरू होती; पण शाहिद कपूर याबद्दल काहीच म्हणाला नव्हता.

शाहिद आपल्या मुलीच्या बाबतीत किती पझेसिव्ह आहे, हे आपण अनेक वेळा पाहिले आहे; पण नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत याबाबत विचारले तेव्हा शाहिद म्हणाला "ऑफर मीराला आली आहे आणि ती तिचे निर्णय घेण्यास समर्थ आहे. तिला अभिनयात पदार्पण करायचे असेल, तर ती करू शकते.

तिचे आयुष्य आहे, तिला आयुष्यात जे काही हवे आहे ते ती करू शकते आणि जाहिरातीची ऑफर मिशाला आली नाहीय. ती फक्त 9 महिन्यांचीच आहे. मीरा तिचे निर्णय स्वतः घेऊ शकते. तिला आयुष्यात काय करायचे आहे, हा निर्णय सर्वस्वी तिचा असेल. मी त्यात ढवळाढवळ करणार नाही. मीराला जर अभिनयात करियर करायचे असेल, तर माझा नक्कीच पाठिंबा असेल.'