'त्या' एका लूक साठी लागले 4 महिने आणि 22 कारागीर !

मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

संजय लीला भन्सालींच्या पद्मावती चित्रपटात महारावल रतन सिंहच्या भूमिकेत दिसणारा शाहिद कपूर पहिल्यादाच अशा वेगळ्या रूपात दिसत आहे. एका प्रख्यात आणि बहादूर भारतीय राजपूत राजाची भूमिका रंगवताना शाहिद कपूर ह्या लूकमध्ये राजपूत राजाच्या शाही रूपात साजेसा दिसतोय.

मुंबई : संजय लीला भन्सालींच्या पद्मावती चित्रपटात महारावल रतन सिंहच्या भूमिकेत दिसणारा शाहिद कपूर पहिल्यादाच अशा वेगळ्या रूपात दिसत आहे. एका प्रख्यात आणि बहादूर भारतीय राजपूत राजाची भूमिका रंगवताना शाहिद कपूर ह्या लूकमध्ये राजपूत राजाच्या शाही रूपात साजेसा दिसतोय.
 
दिल्लीच्या डिझाइनर रिंपल आणि हरप्रीत नरूला ह्यांनी शाहिद कपूरचा हा राजेशाही लूक डिझाइन केलाय. त्यासाठी राजस्थानच्या ऑरगॅनिक फॅब्रिकवर 22 स्थानिक कारागिरांनी बुद्देदारी वर्क करून महारावल रतन सिंहचा लूक चार महिने कसून मेहनत करून बनवला आहे. ह्या शाही कपड्यांमध्ये तपशीलावार काम झालेले दिसून येते आहे. राजस्थानी पारंपरिक रंगांचा वापर तर शाहिदच्या ह्या कपड्यांमध्ये झालेलाच आहे. त्याचप्रमाणेच महारावल रतन सिंहचा शाही आणि मर्दानी अंदाजही दाखवण्यासाठी बारकाईने काम करण्यात आलंय.
 
वायकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि  संजय लीला भन्साली प्रॉडक्शनचा पद्मावती चित्रपट 1 डिसंबर 2017 ला झळकणार आहे.