दिलीप कुमार यांच्या घरी प्रकटला त्यांचा मानसपुत्र

टीम ई सकाळ
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

स्वातंत्र्यदिनी एक गोड घटना दिलीप कुमार यांच्या आय़ुष्यात घडली. गेले अनेक दिवस लीलावती हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी हा महानायक घरी परतला. आणि सत्तराव्या स्वातंत्र्यदिनी त्यांचा मुह बोला बेटा म्हणजेच मानसपुत्र शाहरूख खान त्यांच्या घरी प्रकटला. त्याने त्यांची विचारपूस केली. चौकशी केली. दिलीप कुमार यांच्या पत्नी सायराबानो यांनी या भेटीचे काही फोटो ट्विटरवर टाकून ही माहिती चाहत्यांना दिली. 

मुंबई : स्वातंत्र्यदिनी एक गोड घटना दिलीप कुमार यांच्या आय़ुष्यात घडली. गेले अनेक दिवस लीलावती हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी हा महानायक घरी परतला. आणि सत्तराव्या स्वातंत्र्यदिनी त्यांचा मुह बोला बेटा म्हणजेच मानसपुत्र शाहरूख खान त्यांच्या घरी प्रकटला. त्याने त्यांची विचारपूस केली. चौकशी केली. दिलीप कुमार यांच्या पत्नी सायराबानो यांनी या भेटीचे काही फोटो ट्विटरवर टाकून ही माहिती चाहत्यांना दिली. 

या पोस्ट करतानाच दिलीप कुमार यांची तब्येत आता बरीच उत्तम असून, योग्य उपचार मिळाल्याने हे शक्य झाल्याचे म्हटले. त्यांनी चाहत्यांना धन्यवाद दिले. टि्वटरवर केलेल्या पोस्टनुसार शाहरूख खानने संध्याकाळी दिलीप कुमार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. विचारपूस केली आणि त्याच्या कपाळाचंही चुंबन घेतलं.