the kashmir files: या चित्रपटाला सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा हे दुर्दैव : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटावर टीका केली असून बोलताना केंद्र सरकारवरही निशाणा साधला, ते म्हणाले की..
sharad pawar on the kashmir files
sharad pawar on the kashmir files sakal

sharad pawar : काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय लोकांसमोर आणणाऱ्या THE KASHMIR FILES 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकल्याने जवळपास २५० कोटींहून अधिक कमाई या चित्रपटाने केली. जितके यश या चित्रपटाला मिळाले तितकेच वादही निर्माण झाले. हा चित्रपट रिलीज होण्याआधीच या वादाला सुरुवात झाली. चित्रपट प्रदर्शित होऊन वीस दिवस उलटले तरी अद्याप यावरील वाद थांबलेला नाही. एका विशिष्ट विचारधारेने हा मुस्मिल द्वेषी चित्रपट असल्याचा आरोप केला तर दुसऱ्या विचारधारेने आजवर लपवले गेलेले सत्य जगासमोर आणले म्हणून या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या चित्रपटाबद्दल वक्तव्य केले आहे.

sharad pawar on the kashmir files
मुकेश ऋषी साकारणार अफजलखान, म्हणाले.. शिवाजी महाराज होते म्हणून भारताकडे..

शरद पवार यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'द काश्मीर फाइल्स'चा उल्लेख केला. यावेळी त्यांनी चित्रपटासह केंद्र सरकारवरही त्यांनी निशाणा साधला. या वक्तव्याबाबत खुद्द ANI ने ट्वीट करून माहिती दिली. “एका व्यक्तीने असा चित्रपट (द काश्मीर फाईल्स) तयार केला असून त्यात हिंदूंवर झालेले अत्याचार दाखवण्यात आले आहेत. बहुसंख्याक नेहमीच अल्पसंख्याकांवर हल्ले करतात आणि जेव्हा मुस्लीम वर्ग बहुसंख्यांकांमध्ये येतो तेव्हा हिंदू समाज असुरक्षित होतो, असे विचार या चित्रपटातून दाखवण्यात आले आहेत आणि सत्तेत असणारे लोक या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत ही दुर्दैवी बाब आहे.” असे ट्विट ANI ने केले आहे.

sharad pawar on the kashmir files
प्रियंका चोप्राने बालपणीचे फोटो पोस्ट करत दिला आजीच्या आठवणींना उजाळा...

या ट्विट नंतर पुन्हा नवा वाद उदयास आला आले. यावर विवेक अग्निहोत्री (vivek agnihotri) यांनीही उत्तर दिले असून हा वाद अधिकच चिघळला आहे. शरद पवार यांनी पहिल्यापासूनच या चित्रपटाबाबत तटस्थ भूमिका घेतली होती. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सुरु झालेला वाद आता कुठे शांत होत असताना शरद पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. आता हा वाद अधिकच वाढण्याची शक्यता आहे. ११ मार्च रोजी रिलीज झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाने अवघ्या काही आठवड्यात २५० कोटींची कामे केली. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com