शोएब गातोही 

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

25 फेब्रुवारीपासून "कोई लौट के आया है' ही मालिका स्टार प्लस वाहिनीवर सुरू झालीय. या मालिकेत शोएब इब्राहिम आणि सुरभि ज्योती मुख्य दिसतायत. गेला महिनाभर या मालिकेचे प्रोमोज प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत होते. या मालिकेचे सर्व कलाकार आणि मालिकेचा विषय यावर खूप चर्चा रंगल्या होत्या. प्रेक्षकांना प्रोमोज बघितल्यापासून शोएब आमि सुरभिची जोडी आवडू लागलीय. हे दोघेही या मालिकेवर खूप मेहनत घेतायत. दोघांचे सेटवरच मैत्रीचे सूर जुळलेत. त्यामुळे दोघेही सध्या कुठे गेले तरी एकमेकांविषयी भरभरून बोलत असतात. सुरभि ज्योती छोट्या पडद्यावर खूपच लोकप्रिय अभिनेत्री आहे.

25 फेब्रुवारीपासून "कोई लौट के आया है' ही मालिका स्टार प्लस वाहिनीवर सुरू झालीय. या मालिकेत शोएब इब्राहिम आणि सुरभि ज्योती मुख्य दिसतायत. गेला महिनाभर या मालिकेचे प्रोमोज प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत होते. या मालिकेचे सर्व कलाकार आणि मालिकेचा विषय यावर खूप चर्चा रंगल्या होत्या. प्रेक्षकांना प्रोमोज बघितल्यापासून शोएब आमि सुरभिची जोडी आवडू लागलीय. हे दोघेही या मालिकेवर खूप मेहनत घेतायत. दोघांचे सेटवरच मैत्रीचे सूर जुळलेत. त्यामुळे दोघेही सध्या कुठे गेले तरी एकमेकांविषयी भरभरून बोलत असतात. सुरभि ज्योती छोट्या पडद्यावर खूपच लोकप्रिय अभिनेत्री आहे. नुकतीच तिची "तनहाईया' ही वेबसीरिज हॉट स्टारवर प्रदर्शित झाली आणि लोकप्रियही झाली. आता "कोई लौट के आया है' या मालिकेमध्ये तिची शोएबबरोबर खपच छान गट्‌टी जमली आहे. मूळचा भोपाळचा असलेल्या शोएबची ही चौथी मालिका. याआधी त्याने "रहना है तेरी पलको की छॉंव में', "रिश्‍तों के भॅंवर में उलझी नियती' आणि तीन वर्षांसाठी "ससुराल सिमर का' या मालिकेत प्रेम भारद्वाज ही मुख्य व्यक्तिरेखा केली होती. "कोई लौट के आया है' मालिकेत शोएब कॅप्टन अभिमन्यू सिंग राठोडची भूमिका साकारत आहे. हॉरर, सुपरनॅचरल बाज असलेल्या या मालिकेत शोएबचं अभिनयकौशल्य खुलून दिसतंय. अभिनयाची आवड असलेल्या शोएबला गाताही येतं, यावर कुणाचा विश्‍वास बसणार नाही. आणि बहुतेकांना हे माहीत नाही. त्यामुळे शोएबने त्याचा स्वतःचा गाताना एक व्हिडीओ शूट केला आणि इस्टआग्राम अकाऊंटवर पोस्ट केलाय. या व्हिडीओतून त्याला त्याच्या फॅन्सना एवढंच सांगायचंय, की मला गाताही येतं बरं का... या गाण्यावरून असं दिसतंय, की "कोई लौट के आया है' या मालिकेत त्याची ही गायकी बघायला मिळेल का? तर हे मालिकेच्या येणाऱ्या काही भागात दिसू शकेल कदाचित. पण ही मालिका आधीच 52 भागांची असणार हे जाहीर झालेलं आहे. त्यामुळे तीही शक्‍यता कमीच आहे. म्हणूनच त्याच्या फॅन्सना गाणारा शोएब फक्त त्या व्हिडीओतच दिसेल... 

Web Title: shoaib ibrahim koi laut aaya hai