शंभर ग्लॅमरस मुलींची 'फकाट पार्टी'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

जसराज जोशीसोबत आम्ही पुणेरी हे रॅप गायल्यानंतर याच मराठी ढंगात श्रेयस पुन्हा एकदा 'फकाट पार्टी' द्यायला येत आहे. हे नवे गाणे पार्टी सॉंग असणार आहे. या गाण्यात तब्बल १०० ग्लॅमरस मॉडेल्स असणार आहेत. त्यात काही फाॅरेनर्सचाही समावेश आहे.

मुंबई : जसराज जोशीसोबत आम्ही पुणेरी हे रॅप गायल्यानंतर याच मराठी ढंगात श्रेयस पुन्हा एकदा 'फकाट पार्टी' द्यायला येत आहे. हे नवे गाणे पार्टी सॉंग असणार आहे. या गाण्यात तब्बल १०० ग्लॅमरस मॉडेल्स असणार आहेत. त्यात काही फाॅरेनर्सचाही समावेश आहे.

श्रेयशने आतापर्यंत 'आम्ही पुणेरी' आणि ' वीर मराठे' या दोन गाण्यांमधून हार्डकोअर कॉन्टेन्टफुल ''रॅप' चे स्वरूप लोकांसमोर सादर केले होते. आता मराठीतील या आगळ्यावेगळ्या गाण्यात अलिशान गाड्या, ग्लॅमरस मुली आणि धमाल पाहायला मिळणार आहे.  एव्हरेस्ट इंटरटेनमेन्ट आणि गणराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली सादर होणा-या या पार्टीसॉंगला हर्ष, करण, अदित्य यांनी संगीत दिले असून, सुजित कुमार यांनी या गाण्याचे दिग्दर्शन तसेच कॉरियोग्राफी केली आहे.