चेन्नईत साडीच्या ब्रॅंडने आणली श्रीदेवीच्या साड्यांची रेंज

टीम इ सकाळ
मंगळवार, 20 जून 2017

यावर्षी श्रीदेवी आपले 300 सिनेमे सेलिब्रेट करते आहे. आता तिचा माॅम हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. तिचा मोठा चाहता वर्ग संपूर्ण भारतात आहे, पण त्यातही दक्षिण भारतात हे प्रमाण जरा जास्तच आहे. याचा प्रत्यय नुकताच आला. श्रीदेवीचे 300 सिनेमे आता पूर्ण होत असल्याबद्दल चेन्नईच्या एका साडीच्या ब्रॅडने तिने आजवर सिनेमात काम केलेल्या साडीची रेंज बाजारात आणली आहे

चेन्नई: यावर्षी श्रीदेवी आपले 300 सिनेमे सेलिब्रेट करते आहे. आता तिचा माॅम हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. तिचा मोठा चाहता वर्ग संपूर्ण भारतात आहे, पण त्यातही दक्षिण भारतात हे प्रमाण जरा जास्तच आहे. याचा प्रत्यय नुकताच आला. श्रीदेवीचे 300 सिनेमे आता पूर्ण होत असल्याबद्दल चेन्नईच्या एका साडीच्या ब्रॅडने तिने आजवर सिनेमात काम केलेल्या साडीची रेंज बाजारात आणली आहे. 

या साड्यांमध्ये आवर्जुन उल्लेख करावा लागेल तो मिस्टर इंडीया या सिनेमातील तिच्या निळ्या शिफाॅनच्या साडीचा. शिवाय लम्हे सिनेमातील तिची गाजलेली पिवळी साडीही यात आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या इंग्लिश विंग्लिश सिनेमातील लाल जाड काठाची साडीही यात आहे. 

हे ब्रॅंड बाजारात आणल्यानंतर त्याला महिलांची मोठी पसंती मिळत असल्याचे कळते. तिची दक्षिणेत असलेली क्रेझ लक्षात घेता या भागातील इतर अनेक साडी विक्रेत्यांनी ही रेंज आपल्या दुकानात ठेवायला सुरूवात केली आहे.