सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजपेयी काश्‍मीरमध्ये 

वृत्तसंस्था
शनिवार, 17 जून 2017

सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजपेयी पहिल्यांदाच एका चित्रपटासाठी एकत्र काम करत आहेत, "एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी'नंतर दिग्दर्शक नीरज पांडे जवानांच्या आयुष्यावर आधारित "अय्यारी' हा चित्रपट घेऊन येत असून त्याच्या चित्रीकरणासाठी सध्या सिद्धार्थ व मनोज वाजपेयी काश्‍मीरमध्ये गेले आहेत.

यादरम्यान त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. दोघेही गुरू-शिष्याच्या भूमिकांत आहेत. यात सिद्धार्थ मनोजच्या शिष्याच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट पुढील वर्षात 26 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 