गायिका नर्गिस 

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 जून 2017

इम्तियाज अलीच्या "रॉकस्टार' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री नर्गिस फाखरी आता गायनात पदार्पण करतेय. "हबीता विगाड दी...' असे या गाण्याचे बोल आहेत.

हे गाणे नर्गिस व पंजाबी गायक परिचय यांच्या आवाजात असून या गाण्याच्या व्हिडीओतही हे दोघे टोरोंटोच्या एका प्रसिद्ध टॉवरवर थिरकताना दिसणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्गिसला हिंदी पंजाबी नीट बोलता येत नसल्यामुळे गाणं रेकॉर्ड करताना तिचे तब्बल शंभर टेक्‍स झाले.

आपले उच्चार जास्तीत जास्त बरोबर होण्यासाठी तिने लक्ष दिले. याविषयी नर्गिसने सांगितले की, "जेव्हा मी हे गाणे ऐकले तेव्हा मला खूप आवडले. या गाण्याच्या चित्रीकरणावेळी खूप मजा आली. हे गाणे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.'