पार्श्‍वगायिका परिणीती 

संकलन : चिन्मयी खरे 
बुधवार, 29 मार्च 2017

परिणीती चोप्रा एका मोठ्या ब्रेकनंतर परत एकदा चित्रपटात दिसणार आहे. तिचा "मेरी प्यारी बिंदू' हा चित्रपट 12 मे रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटात परिणीती आणि आयुषमान खुराना मुख्य भूमिकेत आहेत, पण हा चित्रपट परिणीतीसाठी खास आहे. आता तुम्ही म्हणाल असणारच! एवढ्या कालावधीनंतर अभिनयाची संधी मिळाली आहे तर खासच असणार! पण तसं नाहीय. या चित्रपटात परिणीतीने नुसता अभिनयच केलेला नाही, तर या चित्रपटासाठी "माना के हम यार नहीं' हे गाणंसुद्धा गायलंय. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हे गाणं प्रदर्शित झालं.

परिणीती चोप्रा एका मोठ्या ब्रेकनंतर परत एकदा चित्रपटात दिसणार आहे. तिचा "मेरी प्यारी बिंदू' हा चित्रपट 12 मे रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटात परिणीती आणि आयुषमान खुराना मुख्य भूमिकेत आहेत, पण हा चित्रपट परिणीतीसाठी खास आहे. आता तुम्ही म्हणाल असणारच! एवढ्या कालावधीनंतर अभिनयाची संधी मिळाली आहे तर खासच असणार! पण तसं नाहीय. या चित्रपटात परिणीतीने नुसता अभिनयच केलेला नाही, तर या चित्रपटासाठी "माना के हम यार नहीं' हे गाणंसुद्धा गायलंय. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हे गाणं प्रदर्शित झालं. या चित्रपटात आयुषमान खुराना एका बंगाली लेखकाची भूमिका करतोय. ही एक लव्ह स्टोरी आहे, पण गाण्याच्या नावावरून हे सॅड सॉंग आहे हे सांगायची वेगळी गरज नाही. हे गाणं पाहिल्यानंतर प्रेक्षकांची थोडी निराशाच होईल. कारण या गाण्यात फक्त परिणीतीच आहे. त्यामुळे या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी अजून काही काळ थांबावं लागेल. गाण्याबद्दल बोलायचं झालं तर आयुषमानने ट्विटरवरून सांगितल्याप्रमाणे परिणीतीचा आवाज हा त्याच्या नॉव्हेलमधल्या हिरोईनसारखा आहे. खूप स्मूथ आणि सेक्‍सी! तिचा हा गाण्याचा पहिलाच प्रयत्न फारच उत्तम झालाय. त्यामुळे तिने आणखी पार्श्‍वगायन करायला काही हरकत नाही असं गाणं ऐकल्यावर तुम्हाला नक्की वाटेल! परिणीती हिंदुस्थानी क्‍लासिकल गाणं शिकली आहे. तिला पार्श्‍वगायन करण्याची खूप इच्छा होती. खास करून स्वतःचं गाणं गाण्याची तिची इच्छा यानिमित्ताने पूर्ण झालीय, त्यामुळे परिणीती सध्या खूश आहे.