सोनाक्षीचा अनोखा "नूर' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

बॉलीवूडची "दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा "फोर्स टू'चा अपवाद वगळता आतापर्यंत गर्लफ्रेंडच्या टिपिकल रोलमध्येच पाहायला मिळाली. आगामी "नूर' चित्रपटात मात्र ती एका अनोख्या अंदाजात दिसणार आहे. चित्रपटात ती पत्रकाराच्या भूमिकेत आहे. सुन्हील सिप्पी दिग्दर्शित "नूर' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉंच करण्यात आला. त्या वेळी सोनाक्षीबरोबर सुन्हील सिप्पी, भूषण कुमार, कनन गिल, शिबानी दांडेकर, स्मिता तांबे व मनीष चौधरी उपस्थित होते. "नूर'मध्ये सोनाक्षी "हॅपी गो लकी' मुलगी असली तरी तिचा गंभीर अंदाजही दिसणार आहे. वाढलेले वजन आणि करियर लाईफमधली तिची झुंज चित्रपटात दिसेल.

बॉलीवूडची "दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा "फोर्स टू'चा अपवाद वगळता आतापर्यंत गर्लफ्रेंडच्या टिपिकल रोलमध्येच पाहायला मिळाली. आगामी "नूर' चित्रपटात मात्र ती एका अनोख्या अंदाजात दिसणार आहे. चित्रपटात ती पत्रकाराच्या भूमिकेत आहे. सुन्हील सिप्पी दिग्दर्शित "नूर' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉंच करण्यात आला. त्या वेळी सोनाक्षीबरोबर सुन्हील सिप्पी, भूषण कुमार, कनन गिल, शिबानी दांडेकर, स्मिता तांबे व मनीष चौधरी उपस्थित होते. "नूर'मध्ये सोनाक्षी "हॅपी गो लकी' मुलगी असली तरी तिचा गंभीर अंदाजही दिसणार आहे. वाढलेले वजन आणि करियर लाईफमधली तिची झुंज चित्रपटात दिसेल. चित्रपटात 1970 मध्ये सुपरहिट ठरलेले "गुलाबी आँखे जो तेरी देखी' हे गाणे रिक्रिएट करण्यात आलेय. हा चित्रपट पाकिस्तानी लेखक सबा इम्तियाझ यांच्या "कराची यू आर किलिंग मी' कादंबरीवर आधारित आहे. 21 एप्रिलला तो प्रदर्शित होईल. 
 

Web Title: sonakshi sinha in noor