जुडवा 2 ची जादू.. 'उंची है बिल्डिंग'ला काही तासांत 5 लाख व्ह्यूज

टीम ई सकाळ
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

जवळपास 20 वर्षांनी डेव्हिड धवन यांनी पुन्हा जुडवा बनवायला घेतला. या चित्रपटाला नाव जुडवा 2 असे जरी देण्यात आले असले तरी हा जुडवा चा रिमेक अाहे. त्यामुळे सलमान खान, करिष्मा कपूर, रंभा यांच्या सिनेमातील गाणी पुन्हा याा चित्रपटात आली आहेत. गुरुवारी दुपारी उंची है बिल्डिंग हे गाणे लाॅंच करण्यात आले. जयपुरच्या सर्वात उंच इमारतीवरून हे गाणे लोकार्पण करण्यात आले. या गाण्याला मोठा प्रतिसाद मिळाला असून, काही तासांत या गाण्याला पाच लाखांवर हिट्स मिळाले आहेत. 

मुंबई : जवळपास 20 वर्षांनी डेव्हिड धवन यांनी पुन्हा जुडवा बनवायला घेतला. या चित्रपटाला नाव जुडवा 2 असे जरी देण्यात आले असले तरी हा जुडवा चा रिमेक अाहे. त्यामुळे सलमान खान, करिष्मा कपूर, रंभा यांच्या सिनेमातील गाणी पुन्हा याा चित्रपटात आली आहेत. गुरुवारी दुपारी उंची है बिल्डिंग हे गाणे लाॅंच करण्यात आले. जयपुरच्या सर्वात उंच इमारतीवरून हे गाणे लोकार्पण करण्यात आले. या गाण्याला मोठा प्रतिसाद मिळाला असून, काही तासांत या गाण्याला पाच लाखांवर हिट्स मिळाले आहेत. 

उंची है बिल्डिंग..

जुडवा 2 या चित्रपटात वरूण धवन, जॅकलिन फर्नांडिस, तापसी पन्नू यांच्या मुख्य भूमिका आहेत. या नव्या गाण्यासाठी अनू मलिक यांनी पुन्हा एकदा नव्याने हे गाणे क्रिएट केले असून, त्यांचाच आवाज या गाण्याला वापरण्यात आले आहे. या गाण्यात तापसी, वरूण आणि जॅकलिनची हाॅट केमिस्ट्री पाहायला मिळते. आजवर बेबी, शबाना, पिंक अशा चित्रपटातून दिसलेली तापसी हे एक सरप्राईज पॅकेज असणार आहे.