सोनूचा दमदार आवाज

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 एप्रिल 2017

बॉलीवूडमधला एक गोड आवाज म्हणजे सोनू निगम. त्याने आतापर्यंत आपल्या आवाजाची जादू अनेक गाण्यातून दाखवली. फक्त चित्रपटांचीच गाणी नाहीत; तर अनेक मालिकांसाठीही त्याने पार्श्‍वगीत गायन केले. "कहानी घर घर की', "कैसा ये प्यार है', "दिल मिल गए', "बालिका वधू', "पवित्र रिश्‍ता', "इस प्यार को क्‍या नाम दूँ' अशा अनेक मालिकांसाठी त्याने आपला आवाज दिला आहे. त्याने नुकतेच लाईफ ओकेवरील "शेर- ए- पंजाब- महाराजा रणजीत सिंग' या मालिकेसाठी पार्श्‍वगायन केले आहे. या मालिकेचा दिग्दर्शक अभिमन्यू सिंग हा सोनूचा खास मित्र. मग अभिमन्यूने या मालिकेसाठी सोनूला गाण्यासाठी विचारले आणि सोनूनेही होकार दिला.

बॉलीवूडमधला एक गोड आवाज म्हणजे सोनू निगम. त्याने आतापर्यंत आपल्या आवाजाची जादू अनेक गाण्यातून दाखवली. फक्त चित्रपटांचीच गाणी नाहीत; तर अनेक मालिकांसाठीही त्याने पार्श्‍वगीत गायन केले. "कहानी घर घर की', "कैसा ये प्यार है', "दिल मिल गए', "बालिका वधू', "पवित्र रिश्‍ता', "इस प्यार को क्‍या नाम दूँ' अशा अनेक मालिकांसाठी त्याने आपला आवाज दिला आहे. त्याने नुकतेच लाईफ ओकेवरील "शेर- ए- पंजाब- महाराजा रणजीत सिंग' या मालिकेसाठी पार्श्‍वगायन केले आहे. या मालिकेचा दिग्दर्शक अभिमन्यू सिंग हा सोनूचा खास मित्र. मग अभिमन्यूने या मालिकेसाठी सोनूला गाण्यासाठी विचारले आणि सोनूनेही होकार दिला. सोनू ह्या गाण्याबद्दल बोलतो, "मी या मालिकेच्या गीताने भारावून गेलो. मला खात्री आहे, जेव्हा प्रेक्षक हे गाणे ऐकतील तेव्हा या गाण्याच्या शब्दांनी भारावून जातील. 

Web Title: sonu nigam amazing voice for sher e punjab