"सोनू...'चा ट्रेंड ऑन 

वृत्तसंस्था
बुधवार, 14 जून 2017

डिजिटल आणि सोशल मीडियाचा जमाना आल्यापासून कसले ट्रेंड येतील आणि जातील याचा काही भरवसा नाही.

बकेट चॅलेंज, मॅनेक्वीन चॅलेंज, ढिंच्याक पूजा आणि आता आलेला "सोनू, तुला माझ्यावर भरोसा न्हाय काय...' या गाण्याचा. हे गाणे इतके फेमस झाले आहे की अनेक ग्रुप्सनी युट्युब, फेसबुकवर स्वतःचे व्हिडीओ बनवून शेअर केले आहेत.

हे व्हिडीओ युट्युबवर तर कोटीच्या घरात पाहिले गेले आहेत. एवढेच नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी "सोनू'ची आपापली व्हर्जन्स युट्युब, फेसबुकवर शेअर केली आहेत. या गाण्याचे ऍनिमेटेड व्हिडिओजही बनवण्यात आलेले आहेत.

काही डीजेवाल्यांनी तर या गाण्याची लोकगीतेही बनवायला सुरुवात केली आहे. या लोकगीतांनाही कोट्यवधी लोकांचा प्रतिसाद सोशल मीडियावर मिळत आहे. "सोनू' या गाण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर सध्या सुपर हिट ठरतो आहे. वेगवेगळे लोक आपापल्या ग्रुप्सबरोबर या गाण्याचे आपले व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत आणि अशा असंख्य व्हिडीओजचे एकत्रीकरणही काही युट्युब चॅनल्सनी केले आहे.

या गाण्याचा ट्रेंड अजून किती दिवस चालणार माहीत नाही; पण तोपर्यंत प्रेक्षक या व्हिडीओजचा आनंद लुटण्यात कुठलीही कसर ठेवणार नाहीत.