सुप्रिया विनोद यांच्या दुखऱ्या पायावर रुपल करतेय उपचार

मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

टीव्ही मालिकांमधलं सासू-सुनेचं नातं विळ्या-भोपळ्यासारखं असल्याचं अनेकदा पहायला मिळतं. स्टार प्रवाहच्या 'गोठ' या मालिकेतील कांचन म्हापसेकर आणि राधा यांच्यातलं नातं तितकं टोकाचं नाही. मात्र, मालिकेच्या सेटवर राधा अर्थात रुपल आपल्या ऑनस्क्रीन सासुबाईंची, सुप्रिया विनोद यांची पूर्ण काळजी घेत आहे. रुपल मुळची फिजिओथेरपिस्ट असल्यानं सुप्रिया विनोद यांच्या दुखऱ्या पायाच्या बँडेज करण्यापासून सगळं करत आहे.

मुंबई : टीव्ही मालिकांमधलं सासू-सुनेचं नातं विळ्या-भोपळ्यासारखं असल्याचं अनेकदा पहायला मिळतं. स्टार प्रवाहच्या 'गोठ' या मालिकेतील कांचन म्हापसेकर आणि राधा यांच्यातलं नातं तितकं टोकाचं नाही. मात्र, मालिकेच्या सेटवर राधा अर्थात रुपल आपल्या ऑनस्क्रीन सासुबाईंची, सुप्रिया विनोद यांची पूर्ण काळजी घेत आहे. रुपल मुळची फिजिओथेरपिस्ट असल्यानं सुप्रिया विनोद यांच्या दुखऱ्या पायाच्या बँडेज करण्यापासून सगळं करत आहे.

मालिकेची टीम ही एखाद्या कुटुंबाप्रमाणेच राहात असते. एकमेकांच्या अडीअडचणींमध्ये पाठीशी उभं राहणं, मदत करणं, काळजी घेणं असं सगळं होत असतं. स्टार प्रवाहच्या 'गोठ' या मालिकेतील सुप्रिया विनोद यांचा पाय काही दिवसांपूर्वी मुरगळला. मात्र, मालिकेच्या चित्रीकरणाच्या गडबडीत त्यांना पायाकडे नीट लक्ष देता आलं नाही आणि पर्यायी पाय सुजला. ते रुपलच्या लक्षात आलं. तिनं त्यांचा पाय पाहून फ्रॅक्चर नाहीये; तरीही बँडेजिंग करायला हवं असं सांगितलं आणि बँडेजही केलं. सुप्रिया विनोद यांनी चेकअपही केलं. त्यात रुपलनं सांगितल्याप्रमाणे फ्रॅक्चर नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे दुखऱ्या पायानंच सेटवर येणाऱ्या सुप्रिया विनोद यांची काळजी रुपल स्वत: घेत आहे.

'रुपलनं पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज येथून फिजिओथेरपीचं शिक्षण घेतलेलं असल्यानं तिला काय उपचार करायचे हे बरोबर माहीत आहे. अत्यंत प्रेमानं ती माझी काळजी घेते. फक्त माझीच नाही, तर सेटवर कोणाला त्रास होत असेल, तर रुपल कायमच मदत करते. अत्यंत आपलेपणानं सगळ्यांचं करते. आम्ही मालिकेतच नाही, तर प्रत्यक्षातही कुटुंबाप्रमाणेच वावरतो. या कौटुंबिक वातावरणामुळेच काम करायलाही मजा येते,' असं सुप्रिया विनोद यांनी सांगितलं.

आता प्रत्यक्ष मालिकेत राधाच्या आयुष्यात काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी पहा 'गोठ' सोमवार ते शनिवार रात्री ७.३० वाजता आणि २७ नोव्हेंबर पासून बदलेल्या वेळेत म्हणजेच रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर!

टॅग्स