अंक तिसरा : स्टॅच्यू आॅफ लिबर्टी हे नाटक 'जेसीबी प्रणाली'चं समर्थन करतं

रविवार, 8 ऑक्टोबर 2017

दर रविवारी ई सकाळने सुरू केलेल्या अंक तिसरा या उपक्रमात यावेळी सहभागी झाली होती स्टॅच्यू आॅफ लिबर्टी या नाटकाची टीम. अरविंद जगताप लिखित आणि दिग्दर्शित या नाटकाचा प्रयोग आज यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी पाच वाजता रंगणार आहे. त्यापूर्वी आज सकाळी साडेअकरा वाजता या नाटकाच्या टीमने बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात या लाईव्ह चॅटमध्ये सहभाग घेतला. यावेळी अरविंद जगताप, नाट्यनिर्माते राहुल भंडारे, डाॅ. दिलीप घारे, जयंत शेवतेकर, श्वेता आदी मंडळी आॅनलाईन आली होती.

पुणे : दर रविवारी ई सकाळने सुरू केलेल्या अंक तिसरा या उपक्रमात यावेळी सहभागी झाली होती स्टॅच्यू आॅफ लिबर्टी या नाटकाची टीम. अरविंद जगताप लिखित आणि दिग्दर्शित या नाटकाचा प्रयोग आज यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी पाच वाजता रंगणार आहे. त्यापूर्वी आज सकाळी साडेअकरा वाजता या नाटकाच्या टीमने बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात या लाईव्ह चॅटमध्ये सहभाग घेतला. यावेळी अरविंद जगताप, नाट्यनिर्माते राहुल भंडारे, डाॅ. दिलीप घारे, जयंत शेवतेकर, श्वेता आदी मंडळी आॅनलाईन आली होती.

अंक तिसरा : स्टॅच्यू आॅफ लिबर्टी : Live 

नाटकाला प्रमोट करण्यासाठी ई सकाळने अंक तिसरा ही संकल्पना आणली. यापूर्वी या शोमध्ये अर्धसत्य, अमर फोटो स्टुडीओ, आम्ही आणि आमचे बाप, गोष्ट तशी गमतीची, आॅल द बेस्ट 2, संगीत मत्स्यगंधा, पुन्हा सही रे सही या नाटकाचे कलाकार सहभागी झाले होते. यावेळी स्टॅच्यू आॅफ लिबर्टीची टीम या चर्चेत आली. हे नाटक नेमकं काय आहे, कशावर भाष्य करतं, या नाटकाची बलंस्थानं काय आहेत आदी विषयांवर उपस्थितांनी सविस्तर गप्पा मारल्या. या नाटकाबाबत होणारे वाद.. या नाटकाच्या निमित्ताने आलेले अनुभव, एेनवेळी लाईट गेल्यानंतर प्रेक्षकांच्या आग्रहाने मोबाईल टाॅर्चच्या प्रकाशात झालेला प्रयोग, प्रेक्षकाने देऊ केलेली साउंड सिस्टीम आदीवर यावेळी चर्चा झाली. कलाकारांनीही आपले अनुभव आणि नाटकाचं महत्व कथन केलं. 

हे नाटक जातीच्या भिंती तोडून माणूस म्हणून जगण्यास भाग पाडतं असं सांगतानाच डाॅ. घारे म्हणाले, 'जेसीबी मशीन कसं जमीन मुळापासून उकरून काढतं तसं आमचं नाटकही जेसीबी प्रणालीचं समर्थन करतं. जे म्हणजे ज्योतिबा फुले, सी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि बी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांना घेऊन माणूसपणाचं समर्थन करणारं हे नाटक आहे.'

ई सकाळने सुरू केलेल्या अंक तिसरा या उपक्रमाबद्दल सर्वांनीच ई सकाळचं अभिनंदन केलं.