अभिनयाची शाळा! 

दिलीपकुमार
दिलीपकुमार

मी दिलीपकुमार यांच्यासोबत "विधाता' हा पहिला चित्रपट केला. मी तुमचा फॅन आहे. मला तुमच्यासोबत काम करायचे आहे, हे मी त्यांना पहिल्याच भेटीत सांगितले. दिलीपकुमार कथेत खूप फेरफार करतात किंवा कामात ढवळाढवळ करतात, असे मत काही जणांनी सांगितले होते. त्यामुळे त्यांना भेटण्यापूर्वी माझ्या मनात अनेक प्रश्‍न होते; पण प्रत्यक्ष कामादरम्यान मला तसा अनुभव आला नाही. 

दिलीपकुमार यांनी माझ्या कामात ढवळाढवळ केली नाही, हे इतरांना समजले तेव्हा सर्वांना आश्‍चर्य वाटले. असे कसे झाले, हा प्रश्‍न त्यांना पडला. व्यावसायिक कलाकार स्वत-ला दिग्दर्शकाकडे समर्पित करतो. दिलीपकुमार यांनीही व्यावसायिक कलाकार म्हणून स्वत-ला माझ्याकडे समर्पित केले, असे उत्तर मी त्यांना दिले. 

दिलीपकुमार यांनी माझ्या "विधाता', "कर्मा' आणि "सौदागर' अशा तीन चित्रपटांत काम केले. "सौदागर'मध्ये राजकुमार आणि दिलीपकुमार हे दोघेही होते. दोघेही उत्तम कलाकार. त्यामुळे सुरवातीला मनात भीती दाटलेली होती. तेव्हा दिलीपकुमार यांनी मला धीर दिला.

ते मला म्हणाले, "तू घाबरू नकोस. राजकुमारला तुला जेवढे महत्त्व द्यायचे आहे तेवढे दे. मी माझे काम करणार आहे. माझी काही पर्वा करू नकोस.' तसेच झाले. सेटवर ते लहान मुलांबरोबर अधिक रमत. माझी मुलगी मेघना तेव्हा लहान होती. तिला सेटवर घेऊन ये, असे ते सांगत. ती सेटवर आली की ते तिच्याशी खेळत असत. 

दिलीपकुमार महान अभिनेते आहेत. त्यांची कॉपी नंतर काही कलाकार करू लागले. ते अभिनयाची जणू काही शाळाच आहेत. या इंडस्ट्रीतील ते लिजंड आहेत. त्यांची जागा कुणीही कलाकार घेणार नाही. ते अनेकांसाठी आदर्श आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच अनेक अभिनेते सुपरस्टार झाले आहेत. ते नेहमीच अभिनयाने सगळ्यांना अवाक्‌ करतात.

मला प्रत्येक दिवशी त्यांच्याकडून वेगळे काही तरी शिकायला मिळायचे. त्यांच्याकडून मी इतरांवर प्रेम करायला आणि स्वत-चा स्वाभिमान टिकवून ठेवायला शिकलो. या इंडस्ट्रीत मला भेटलेली ती सगळ्यात ग्रेट व्यक्ती आहे. ते अनेक दिवसांपासून आजारी आहेत. ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com