ई सकाळ #Live धमाल : सुबोधचे टोमणे आणि सोनालीची हास्याची कारंजी

सौमित्र पोटे/ कॅमेरा : योगेश बनकर.
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे ती सोनाली कुलकर्णी आणि सुबोध भावे यांच्या तुला कळणार नाही या चित्रपटाची. या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसत आहेत. ही संधी साधून ई सकाळच्या फेसबुक पेजवरून हे दोघे थेट ई सकाळच्या वाचकांशी बोलते झाले. यावेळी चित्रपटाच्या दिग्दर्शिका स्वप्ना-वाघमारे जोशी याही उपस्थित होत्या.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे ती सोनाली कुलकर्णी आणि सुबोध भावे यांच्या तुला कळणार नाही या चित्रपटाची. या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसत आहेत. ही संधी साधून ई सकाळच्या फेसबुक पेजवरून हे दोघे थेट ई सकाळच्या वाचकांशी बोलते झाले. यावेळी चित्रपटाच्या दिग्दर्शिका स्वप्ना-वाघमारे जोशी याही उपस्थित होत्या. 

पहा सुबोध सोनालीची लाईव्ह धमाल.. 

या लाईव्ह शोला सुरूवातच झाली ती सुबोध सोनाली यांच्या लाडीक भांडणापासून. तुला कळणार नाही या शीर्षकामागे लपलेल्या कहाण्या, लपलेले चित्रिकरणादरम्यानचे किस्से या दोघांनी शेअर केले. त्याचवेळी एकमेकांमध्ये जमून आलेली केमिस्ट्रीही दिसली. यावेळी बोलताना सुबोध म्हणाला, हा चित्रपट लग्नानंतरच्या नवरा बायकोच्या नात्यावर बोलतो, पण म्हणून तो गंभीर अंगाने जात नाही. उलट अतिशय खुसखुशीत पद्धतीने याचं चित्रण करण्यात आलं आहे. सोनालीनेही याला दुजोरा दिला. सुबोधसोबत पहिल्यांदाच काम करत असताना आलेला अनुभव, एक सहकलाकार म्हणून त्याने दिलेले सहकार्य आदीचा उल्लेख तिने केला. त्याचवेळी सुबोधनेही सोनालीच्या चांगल्या  बाबी स्पष्ट केल्या. सेटवर सोनाली कसे विनोद करायची, त्यामुळे तिच्या विनोदांचा आपल्याला कसा त्रास व्हायचा हे दिग्दर्शिका स्वप्ना आणि सुबोध यांनी सांगितल्यावर हास्याचा एकच कारंजा उडाला. 

यावेळी ई सकाळच्या अनेक वाचकांनी प्रश्नही विचारले. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो सानिका ठिगळे, प्राची आंधळकर, चैतन्य, मानसी पाटील-परांजपे, अभिजीत धाडके, कल्याणी मित्रगोत्री यांचा. हा चित्रपट 8 सप्टेंबरला प्रदर्शित होत असून, तो सर्वांनी आवर्जून पाहावा असे आवाहन यावेळी या तिघांनीही केलं.