सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर जोडीचा 'वेलकम होम’चं शूट सुरू 

sumitra bhave sunil sukathankar new film welcome home marathi esakal news
sumitra bhave sunil sukathankar new film welcome home marathi esakal news

मुंबई : चित्रपट म्हणजे समाजमनाचा आरसा असतो या श्रद्धेने वैविध्यपूर्ण विषयांवर चित्रपटनिर्मिती करणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचा समावेश होतो. दोघी, वास्तुपुरुष, अस्तु, देवराई, बाई, पाणी, कासव या चित्रपटांसाठी तब्बल ७ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेली ही दिग्दर्शक द्वयी आता ‘वेलकम होम’ हा चित्रपट घेऊन येत आहे. चित्रपटाची कथा, पटकथा सुमित्रा भावे यांची असून या चित्रपटाच्या मुहूर्ताचा  ‘क्लॅप’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आला.

बाईचं घर नेमकं कोणतं? तिच्या आई-वडिलांचं, नवऱ्याचं की तिचं स्वतःचं? असा प्रश्न या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. घर या संकल्पनेभोवती गुंफलेल्या नात्यांचा शोध घेणाऱ्या या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, सुमित राघवन, स्पृहा जोशी, डॉ. मोहन आगाशे, उत्तरा बावकर, दीपा श्रीराम, सेवा चौहान, सिद्धार्थ मेनन, सारंग साठ्ये, अश्विनी गिरी, अभय कुलकर्णी, बालकलाकार प्रांजली कांबळे यांची प्रमुख भूमिका आहे.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com