खेळा पण प्रेमाने; सनी लिओनीची जाहिरात आली पुन्हा गोत्यात

टीम ई सकाळ
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

गेले काही महिने सनी लिओनी सतत चर्चेत आहे. तिने केलेल्या जाहिराती, तिने केलेले सिनेमे इथपासून तिने दत्तक घेतलेली मुलगी अशी तिची प्रत्येक गोष्ट चर्चेचा विषय ठरतो. कारण सनी लिओनीवर तमाम भारतीयांचा डोळा आहे. असं गुगलने सिद्ध केलं आहे. त्यात आता आणखी एक भर पडली असून एक नवा वाद निर्माण झाला आहे. हा वाद एका निरोधाच्या जाहिरातीमुळे निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून गुजरातमधल्या अनेक फलकांवर या निरोधाची जाहिरात आहे. त्यात सनीचा अवतार सोज्वळ पारंपरिक पोषाखातला असला तरी नवरात्री.. खेळा पण प्रेमाने असा सल्ला देण्यात आल्याने गुजरातमधील हिंदूत्ववादी संस्थांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. 

सुरत : गेले काही महिने सनी लिओनी सतत चर्चेत आहे. तिने केलेल्या जाहिराती, तिने केलेले सिनेमे इथपासून तिने दत्तक घेतलेली मुलगी अशी तिची प्रत्येक गोष्ट चर्चेचा विषय ठरतो. कारण सनी लिओनीवर तमाम भारतीयांचा डोळा आहे. असं गुगलने सिद्ध केलं आहे. त्यात आता आणखी एक भर पडली असून एक नवा वाद निर्माण झाला आहे. हा वाद एका निरोधाच्या जाहिरातीमुळे निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून गुजरातमधल्या अनेक फलकांवर या निरोधाची जाहिरात आहे. त्यात सनीचा अवतार सोज्वळ पारंपरिक पोषाखातला असला तरी नवरात्री.. खेळा पण प्रेमाने असा सल्ला देण्यात आल्याने गुजरातमधील हिंदूत्ववादी संस्थांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. 

सुरतमधल्या हिंदू युवा वाहिनी या संस्थेने या जाहिरातींवर आक्षेप घेतला आहे. नवरात्री हा उत्सव तमाम हिंदू लोकांसाठी देवीचा जागर असतो. त्यावेळी अशा स्वरूपाचे फलक लावून हिंदूंच्या भावनेचा अनादर करण्यात आला आहे अशी भूमिका हिंदू युवा वाहिनीच्या प्रवक्त्यांनी घेतली आहे. याचा परिणाम म्हणून त्या फलकांवरच्या निरोधाच्या कंपनीचं नाव फलकावरून गायब झालं आहे. गुजरात सरकारने मात्र याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही.